नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 27 लाखांवर पोहोचली आहे. तर हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या संभळ जिल्ह्यात घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीत एका मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका 16 वर्षीय मुलीने 14 ऑगस्ट रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. संभळमध्ये ही घटना घडली. मुलीने आत्महत्या करण्याआधी पंतप्रधान मोदींना 18 पानांचं पत्र लिहिलं आहे. हे पत्र पाहून सर्वच जण हैराण झाले. वाढते प्रदूषण, भ्रष्टाचार आणि समाजाला त्रास देणाऱ्या काही लोकांना कंटाळून या मुलीने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. या सर्व गोष्टींचा उल्लेख तिने पत्रातही केला आहे. वृद्धांना भेडसावणाऱ्या समस्यांमुळेही मुलगी अस्वस्थ होती.
मुलीच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता त्यांना मुलीने पंतप्रधानांना लिहिलेलं एक 18 पानांचं पत्र मिळालं आहे. या पत्रात मुलीने वाढते प्रदूषण, वृक्षतोड आणि वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.तसेच पंतप्रधान मोदींना भेटून या सर्व प्रश्नांवर आपल्याला चर्चा करायची आहे असेही म्हटलं. वाढत जाणारी लोकसंख्या, दिवाळीत वाजवले जाणारे फटाके आणि होळीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक रंगावर बंदी घालण्याची मागणीही तिने पत्रात केली आहे.
वृद्धांना भेडसावणाऱ्या समस्यांमुळेही ती अस्वस्थ होती. ज्या ठिकाणी मुलं आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात त्या ठिकाणी मला राहायचंही नाही असं तिने पत्राच्या सुरूवातीला लिहिल्याचं म्हटलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्टच्या रात्री मुलीने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरून बंदूक ताब्यात घेतली आहे. पोलिसांना 18 पानांचे पत्रही सापडले आहे. मुलीवर काही दिवसांपासून मानसिक उपचार सुरू होते अशी माहिती तिच्या कुटुंबाने दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
VIDEO: ...अन् बिहारच्या डीजीपींनी थेट रिया चक्रवर्तीची 'औकात' काढली; ऐका काय म्हणाले
बापरे! आग्र्यामध्ये प्रवाशांनी भरलेली बस हायजॅक, परिसरात खळबळ
"...तर पंजाब पेटून उठेल", मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा
CoronaVirus News : तंत्रज्ञानाची कमाल! आता चेहऱ्यावर मशीन लावणार मास्क, Video तुफान व्हायरल
"काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं?, असा प्रश्न विचारत शहा एम्समध्ये उपचारासाठी दाखल"