धक्कादायक! अचानक प्रियकर झाला बेपत्ता; संतापलेल्या प्रेयसीने मुलाच्या आईवर केला जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 12:06 PM2023-01-14T12:06:11+5:302023-01-14T12:06:49+5:30
मध्य प्रदेशातील ग्वालियर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
ग्वालियर:मध्य प्रदेशातीलग्वालियर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे प्रेयसीला प्रियकराने धोका दिल्यावर तिने जो बदला घेतला त्याने एकच खळबळ माजली. खरं तर लिव्ह-इन पार्टनरने सोडल्यानंतर प्रेयसीला राग अनावर झाला आणि तिने प्रियकराच्या आईवर जीवघेणा हल्ला केला. जुना छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जव्हार परिसरात शुक्रवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. जमहार गावात राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणाची ग्वालियरमधील 21 वर्षीय तरुणीशी ओळख झाली. सोशल मीडियावरील ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले.
दरम्यान, लवकरच दोघे लिव्ह-इनमध्ये राहू लागले. 15 दिवसांनंतर संबंधित प्रियकराने त्याच्या प्रेयसीला सोडून दिले. म्हणून तरुणी त्याला शोधण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली. तिथे तिने त्या मुलाच्या आईशी वाद घातला. याच रागातून तरुणीने प्रियकराच्या आईच्या गळ्यावर चाकूने वार केले. महिलेला गंभीर अवस्थेत ग्वालियर जैरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुना छावणी पोलिसांनी आरोपी तरुणीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रियकराच्या आईवर काढला राग
स्थानिक सीएसपी रवी भदोरिया यांनी सांगितले की, आरोपी 21 वर्षीय तरुणी सोनम चार शहरातील नाका भागात राहते. जमहार गावातील राम लखनशी तिची मैत्री झाली. राम लखन हे मोबाईलचे दुकान चालवतो. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि काही दिवसांपासून दोघेही घर सोडून भाड्याच्या घरात राहू लागले. दोन-तीन दिवसांपूर्वी सोनमला सोडून राम लखन अचानक बेपत्ता झाला. यानंतर सोनमने त्याचा शोध घेत जमाहर गाव गाठले. इकडे राम लखन त्याच्या वडिलोपार्जित घरातही सापडला नाही, त्यामुळे सोनमने त्याच्या आई-वडिलांना राम लखनबद्दल विचारणा केली असता वाद झाला.
मुलाच्या आईशी झाला वाद
बेपत्ता प्रियकर रामची आई गुड्डीबाई यांनी सोनमला आपल्या मुलाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. यावरून सोनम आणि गुड्डी यांच्यामध्ये वाद झाला. मग संतापलेल्या सोनमने रामच्या आईवर चाकूने हल्ला केला. मुलीच्या चाकूने गुड्डी यांच्या गळ्यावर वार केला, त्यामुळे त्या जागीच खाली पडल्या. हल्ला केल्यानंतर सोनम तिथून फरार झाली. गुड्डी यांचे पती राकेश बाथम याने पोलिसांना माहिती दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"