शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
2
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
3
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
4
न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली
5
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
6
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
7
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
8
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
9
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
10
यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
11
प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."
12
"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने..."; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, मोदींनाही सवाल
13
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
14
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
16
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
17
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
18
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
19
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
20
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 

धक्कादायक! अचानक प्रियकर झाला बेपत्ता; संतापलेल्या प्रेयसीने मुलाच्या आईवर केला जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 12:06 PM

मध्य प्रदेशातील ग्वालियर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ग्वालियर:मध्य प्रदेशातीलग्वालियर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे प्रेयसीला प्रियकराने धोका दिल्यावर तिने जो बदला घेतला त्याने एकच खळबळ माजली. खरं तर लिव्ह-इन पार्टनरने सोडल्यानंतर प्रेयसीला राग अनावर झाला आणि तिने प्रियकराच्या आईवर जीवघेणा हल्ला केला. जुना छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जव्हार परिसरात शुक्रवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. जमहार गावात राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणाची ग्वालियरमधील 21 वर्षीय तरुणीशी ओळख झाली. सोशल मीडियावरील ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले.

दरम्यान, लवकरच दोघे लिव्ह-इनमध्ये राहू लागले. 15 दिवसांनंतर संबंधित प्रियकराने त्याच्या प्रेयसीला सोडून दिले. म्हणून तरुणी त्याला शोधण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली. तिथे तिने त्या मुलाच्या आईशी वाद घातला. याच रागातून तरुणीने प्रियकराच्या आईच्या गळ्यावर चाकूने वार केले. महिलेला गंभीर अवस्थेत ग्वालियर जैरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुना छावणी पोलिसांनी आरोपी तरुणीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रियकराच्या आईवर काढला राग स्थानिक सीएसपी रवी भदोरिया यांनी सांगितले की, आरोपी 21 वर्षीय तरुणी सोनम चार शहरातील नाका भागात राहते. जमहार गावातील राम लखनशी तिची मैत्री झाली. राम लखन हे मोबाईलचे दुकान चालवतो. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि काही दिवसांपासून दोघेही घर सोडून भाड्याच्या घरात राहू लागले. दोन-तीन दिवसांपूर्वी सोनमला सोडून राम लखन अचानक बेपत्ता झाला. यानंतर सोनमने त्याचा शोध घेत जमाहर गाव गाठले. इकडे राम लखन त्याच्या वडिलोपार्जित घरातही सापडला नाही, त्यामुळे सोनमने त्याच्या आई-वडिलांना राम लखनबद्दल विचारणा केली असता वाद झाला. 

मुलाच्या आईशी झाला वाद बेपत्ता प्रियकर रामची आई गुड्डीबाई यांनी सोनमला आपल्या मुलाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. यावरून सोनम आणि गुड्डी यांच्यामध्ये वाद झाला. मग संतापलेल्या सोनमने रामच्या आईवर चाकूने हल्ला केला. मुलीच्या चाकूने गुड्डी यांच्या गळ्यावर वार केला, त्यामुळे त्या जागीच खाली पडल्या. हल्ला केल्यानंतर सोनम तिथून फरार झाली. गुड्डी यांचे पती राकेश बाथम याने पोलिसांना माहिती दिली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशgwalior-pcग्वालियरCrime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस