शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

Tamil Nadu: धक्कादायक! प्रेयसीने डॉक्टर प्रियकराला पाठवले हॉस्टेलमधील मैत्रिणींचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 5:16 PM

तामिळनाडू मधील मदुराई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : तामिळनाडू मधील मदुराई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंडीगड विद्यापीठातील वसतिगृहातील मुलींचे न्यूड फोटो (Nude Photos)  काढून व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी एका विद्यार्थिनीला अटक केली आहे. एवढेच नाही तर तिने हे फोटो तिने तिच्या डॉक्टर प्रियकराला पाठवले म्हणून त्याला देखील अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रामनाथपुरम कामुडी येथील डॉक्टर प्रियकर आणि मदुराई येथील बीएडची विद्यार्थिनी असलेली त्याची मैत्रीण जननी या दोघांना आयपीसी आणि आयटी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.

न्यूड व्हिडीओ काढल्याप्रकरणी कारवाईमदुराई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थीने तिच्या वसतिगृहामधील मैत्रीणींचे फोटो आणि व्हिडीओ काढायला सुरूवात केली. जेव्हा तिच्या मैत्रीणी आंघोळ करण्यासाठी अथवा कपडे बदलण्यासाठी जायच्या तेव्हा ती हा प्रताप करायची. नंतर ती हे फोटो आणि व्हिडीओ व्हॉट्सपवरून आपल्या प्रियकराला पाठवायची. मात्र एके दिवशी ती हे सगळे करत असल्याचे तिच्या मैत्रीणीच्या निदर्शनास आले. तेव्हा जननीच्या मैत्रीणीने तिचा फोन तपासला आणि त्यामध्ये विविध प्रकारचे न्यूड फोटो आढळून आले. तिने वसतिगृहाच्या वॉर्डनला माहिती दिली असता त्यांनी मदुराई अण्णा नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

दरम्यान, तक्रार सायबर क्राइमकडे सोपवण्यात आली. पोलिसांनी म्हटले, "जननी मार्च महिन्यापासून पीजी वसतिगृहामध्ये राहत आहे. तिने वसतिगृहामधील तिच्या मैत्रिणींचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ काढले, ज्यात आंघोळ करतानाचे न्यूड व्हिडीओ आणि फोटोंचा समावेश आहे. ते सगळे फोटो आणि व्हिडीओ तिने तिच्या प्रियकराला पाठवले." लक्षणीय बाब म्हणजे प्रियकर चालवत असलेल्या क्लिनिकमध्ये एकत्र काम करत असताना प्रेयसी जननीचे त्याच्यासोबत प्रेमसंबंध होते, असेही पोलिसांनी सांगितले. जननीने आधी स्वतःचे न्यूड व्हिडीओ काढले पण नंतर तिच्या प्रियकराच्या विनंतीनुसार तिने तिच्या वसतिगृहातील मैत्रिणींचे देखील न्यूड फोटो आणि व्हिडीओ पाठवण्यास सुरुवात केली.

दोघांनाही घेतले ताब्यातएका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जननीने त्या दोघांमधील संवादाचा पुरावा डिलीट केला आहे. त्यामुळे अधिक तपास करण्यामध्ये पोलिसांना अडचण येत आहे. तर दोघांचेही फोन जप्त करण्यात आले आहेत आणि डेटा रिकव्हरीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला आहे. प्रियकराने हे फोटो आणि व्हिडीओ कोणाला फॉरवर्ड केले आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र दोघांनाही स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. 

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdoctorडॉक्टरArrestअटक