पाटणा - देशात एकीकडे कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनसारखे कठोर मार्ग अवलंबले जात आहेत. मात्र या गंभीर वातावरणातही काही जण विरंगुळ्याचे एक दोन क्षण शोधत आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या अनेकजण घरीच असल्याने विरंगुळ्यासाठी ते सोशल मीडियावर अधिक अॅक्टिव्ह राहू लागले आहेत. त्यातून फनी मिम्स आणि ट्रोलिंगही मोठ्या प्रमाणात होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे ट्विटर अकाऊंटही सध्या या चर्चांचे केंद्र बनले आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत केलेल्या ट्विटखाली एका तरुणाने आपल्या प्रेमाची व्य़ा मांडत गर्लंफ्रेंडचं लग्न थांबवण्याच्या केलेल्या मागणीमुळे या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यातच या गर्लफ्रेंडनेही आता या तरुणाला उत्तर दिल्याने चर्चेत रंगत आली आहे.
बिहारमध्ये लॉकडाऊन वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर पंकजकुमार गुप्ता या तरुणाने मुख्यमंत्र्यांना उद्देशून ट्विट केले होते. या ट्विटमध्ये तो म्हणतो की, सर जर तुम्ही लग्न विवाहांनाही बंदी घातली असती तर १९ मे रोजी होणारा माझ्या गर्लफ्रेंडचा विवाह थांबला असता. त्यासाठी मी तुमचा जन्मभर ऋणी राहीन. दरम्यान, या तरुणाने केलेल्या या मागणीची ट्विटरवर खूप चर्चा सुरू आहे.
दरम्यान, आता या ट्विटवर नव्या कुमारी नावाच्या तरुणीने प्रतिक्रिया दिली आहे. त्याखाली अनेक लोक कमेंटही करत आहेत. या तरुणीने दावा केला की, ती पंकजची गर्लफ्रेंड आहे. पंकज तिला सोडून पूजाशी बोलला नसता तर तिने पंकजला सोडले नसते.
या ट्विटमध्ये ती पुढे लिहिते की, आता तिचं लग्न होत आहे. असा परिस्थितीत पंकजने कृपया आपलं लग्न मोडण्याचा विषय काढू नये, अशी विनंती तिने केली आहे. तसेच भलेही अन्य कुणासोबतही विवाह केला तरी माझ्या हृदयात पंकजच कायम राहील. तसेच पंकज तिच्या लग्नामध्ये नक्की येईल, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.
आता या ट्विटखाली नेटिझन्सच्या गमतीदार प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. त्यामुळे कालपासून हे ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे.