पाटणा : मुझफ्फरपूर येथील बालिकागृहातील लैंगिक अत्याचारप्रकरणी बिहारच्या समाजकल्याण खात्याच्या सहा अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शनिवारपासून निलंबित करण्यात आले.हे अधिकारी मुझफ्फरपूर, मुंगेर, अरारिया, मधुबनी, भागलपूर, भोजपूर या सहा जिल्ह्यातील बालसंरक्षण कक्षाचे सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत होते. या जिल्ह्यांतील बालिकागृहांमध्ये झालेल्या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करणे, आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तातडीने हालचाल न करणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत.मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्था (टीस) या संस्थेने मुझफ्फरपूर येथील बालिकागृहात मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे निदर्शनास आणले होते. या प्रकरणी राज्याच्या समाजकल्याण विभागाने जून महिन्यात एफआयआर दाखल केल्यानंतर दहा लोकांना अटक झाली होती.
बालिकागृह प्रकरण; ६ निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 3:56 AM