मुझफ्फरनगर - माणुसकीला काळीमा फासणारी घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. 23 वर्षीय एका तरुणाला बेदाम मारहाण करत नग्न धिंड काढली. एक किलोमीटरपर्यंत मारहाण करत त्याची धिंड काढल्याचा धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना मुजफ्फरनगरमध्ये घडली आहे. 23 वर्षीय तरुणाची एक किलोमीटरपर्यंत नग्न धिंड काढली. त्या 23 वर्षीय तरुणाला तरुणीच्या कुटुंबीयांनी ही मारहाण केली आहे. घरातील मुलीसोबत हॉटेलमध्ये कॉफी घेत असल्याचे पाहिल्यानंतर त्यांचा पारा चढला आणि त्यांनी त्याला मारहाण करत नग्न धिंड तर काढलीच शिवाय यादरम्यान त्याला परेडही करायला लावली. त्या तरुणीच्या कुटुंबीयांनी त्या तरुणाला बेदाम मारहाण केल्यामुळं तो अर्धमेला झाला होता. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. त्यानंतर जमावातील काही लोकांनी त्या तरुणाला जवळील रुग्णालयात दाखल केलं. कुटुंबातील सदस्या भेटायला आल्यानंतर त्याने झालेला प्रकार सांगितला.
त्या तरुणीच्या कुटुंबीयांनी असा दावा केला आहे की, आम्ही स्वत: त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. हा तरुण फोन करुन मुलीला सतत त्रास देत होता असाही आरोप केला आहे. पण जखमी तरुणाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने ती मुलगी आपली प्रेयसी असल्याचा दावा केला आहे. खूप दिवसांपासून आम्ही एकमेंकांना ओळखतो. आम्हा दोघांना सोबत पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी मारहाण केल्याचा आरोप त्या तरुणाने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी त्या तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी दोन्ही कुटुंबीयामध्ये तू-तू मैं-मैं झालं. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या कुटुबीयांना बेदाम मारहाण केली. रुग्णालयातील प्रशासनाने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. वेळेवर पोलिस घटनास्थळी पोहचले असता त्यांनी काही लोकांना अटक केली आहे. या घटनेचा व्हीडिओ तेथील स्थानिकांनी बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पोलिसांनी सांगितले की, तरुणीच्या कुटुबीयांसह 12 ते 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे..