नवी दिल्ली - सहा वर्षांत भारतात दत्तक घेतल्या गेलेल्या मुलांमध्ये निम्म्याहून अधिक मुली होत्या, असे सरकारी आकडेवारीवरून दिसते. देशभरातील दत्तक व्यवहारांचे नियमन करणा-या ‘चाइल्ड अॅडॉप्शन रीसोर्स अॅथॉरिटी’ने (सीएआरए) दिलेल्या माहितीनुसार सन २०१७-१८ मध्ये आतापर्यंत देशात एकूण ३,२७६ मुलांना दत्तक घेतले गेले. त्यात १,८५८ मुली तर १,४१८ मुले होती.मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर राहिले. महाराष्ट्रात एकूण ६४२ मुले दत्तक घेतली गेली त्यापैकी ३५३ मुली होत्या. मुलींना दत्तक घेण्यामध्ये महाराष्ट्राच्या खालोखाल कर्नाटक व पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. सहा वर्षांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता असे दिसते की, सरासरी ५९.७७ दाम्पत्यांनीमुलगी दत्तक घेणे पसंत केले.तर मुलगा दत्तक घेणाºयांचेसरकारी प्रमाण ४०.२३ टक्के राहिले. विशेष म्हणजे ज्या राज्यांमध्ये मुलींचा जन्मदर व्यस्त आहे अशा हरियाणा व उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्येही मुली दत्तक घेण्याकडे कल दिसून आला.निराधार म्हणून सोडून दिल्या जाणाºया अर्भकांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दत्तक घेतल्या जाणाºयाही मुलीच जास्त असतात, असा एक सर्वसाधारण समज आहे.मात्र ‘सीएआरए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी लेफ्ट. कर्नल दीपक कुमार यांनी याचा ठाम इन्कार करताना सांगितले की, मुल दत्तकघेऊ इच्छिणाºया पालकांना आम्ही त्यांची पसंती आधीच कळविण्याचा नेहमीच पर्याय देतो. मुलाला पसंती देणे, मुलीला पसंती देणे किंवा कोणताही पसंती न देणे असे तीन पर्याय त्यांना दिले जातात. यानुसार जे खास करून मुलींसाठीच पसंती देतात अशा दाम्पत्यांचे प्रमाण ५५.४ टक्के दिसून येते.अपंग, मोठी मुले नकोशीअपंगत्वामुळे विशेष गरजा असलेली मुले दत्तक घेण्यात आपल्याकडे फारसा कल दिसून येत नाही.पाश्चात्य देशांमध्ये उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध असल्याने व सरकारही बरीच आर्थिक मदत देत असल्याने अशा मुलांना दत्तक घेण्यास लोक तयार होतात, असे लेफ्ट. कर्नल दीपक कुमार म्हणाले.आपल्याकडे चार ते सहा वर्षांहून अधिक मोठे असलेले मूल दत्तक घेण्यास फारसे कोणी तयार होत नाही. परिणामी अनाथ मुलांचे वय एकदा पाच-सहा वर्षांच्या पुढे गेले की त्यांना दत्तक पालक मिळण्याची शक्यता खूपच कमी होते.देशाबाहेर दत्तक घेतल्या जाणाºया मुलांमध्येही दिसते. परदेशात दत्तक घेतल्या गेलेल्या मुलांची संख्या सन २०१६-१७ मध्ये ५७८ होती ती यंदाच्या वर्षी वाढून ६५१ झाली.
दत्तक घेणाऱ्यांमध्ये मुलींना आहे अधिक पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 2:00 AM