जग खूप पुढे जात आहे. विज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे, ज्याचा प्रत्यय आपल्याला विविध गोष्टींमधून येतो. एकीकडे जग चंद्रावर आणि मंगळावर पोहोचले आहे, तर काही ठिकाणं अशी आहेत की जिथे लोकांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मुलांना शाळेत जाण्यासाठीही रस्ता नसल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पूलच नाहीत, अशा स्थितीत मुलं जीव मुठीत धरून शाळा गाठत आहेत. विशेषत: या व्हिडीओमध्ये एका विद्यार्थिनीची शाळा गाठण्यासाठी जी धडपड सुरू आहे ते पाहून तुम्ही हादरून जाल. व्हिडिओमध्ये काही मुली जीव धोक्यात घालून शाळेत जाताना दिसत आहेत.
नदीच्या या बाजूला एक शाळकरी मुलगी उभी राहून नदी पार करण्याचा प्रयत्न करत आहे. नदी पार करण्यासाठी एका बाजूला दोरी बांधण्यात आली असून त्याच दोरीच्या साहाय्याने मुलगी नदी पार करत आहे. हे दृश्य हादरवून टाकणारं आहे कारण यात थोडीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. नदीतील पाण्याचा प्रवाह खूप वेगवान आहे, ज्यामुळे ती वाहून गेली असती. तरीही ती अभ्यासासाठी हा धोका पत्करण्यास तयार आहे.
ही घटना कुठे घडली याबाबत काहीही माहिती नसली तरी ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. @cctvidiots नावाच्या आयडीने हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केले गेले आहे. त्यासोबत लिहिले आहे, जगाच्या काही भागात मुलं फक्त शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालतात. हा व्हिडिओ आतापर्यंत 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"