लग्नाचं पक्क नसेल तर मुलींनी शारीरिक संबंध ठेवू नयेत - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 02:06 PM2021-08-15T14:06:00+5:302021-08-15T14:07:21+5:30

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणी सुनावणी करताना, न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर यांच्या खंडपीठाने महत्वाची बाब नमूद केली आहे.

Girls should not have sexual relations if marriage is not finalized - High Court | लग्नाचं पक्क नसेल तर मुलींनी शारीरिक संबंध ठेवू नयेत - हायकोर्ट

लग्नाचं पक्क नसेल तर मुलींनी शारीरिक संबंध ठेवू नयेत - हायकोर्ट

Next
ठळक मुद्देएका महिलेने दाखल केलेल्या प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने ही बाब नमूद केली आहे. याप्रकरणात एका पीडित मुलीने तरुणावर बलात्काराचा आरोप लावला होता

इंदौर - लग्नाची गोष्ट पक्की नसेल तर मुलींनी शारिरीक संबंध ठेवू नयेत, असे मध्य प्रदेशच्या इंदौर उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय देताना ही बाब नोंदवली आहे. यासंदर्भात जनसत्ता या न्यूज पोर्टलने वृत्त दिले आहे. भारत अद्यापही एक रुढी आणि परंपरा जपणारा देश आहे. देशात सभ्यतेच्या मर्यादा असल्यानेच लग्नाअगोदर मुलगा आणि मुलींमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होण्यास येथे मान्यता नाही.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणी सुनावणी करताना, न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर यांच्या खंडपीठाने महत्वाची बाब नमूद केली आहे. भारत अद्यापही रुढी, परंपरा जपणारा देश आहे, त्यामुळेच सभ्यतेच्या मर्यादा येथे ओलांडल्या नाहीत, जेथे लग्नाअगोदर केवळ वचन आणि आश्वासनांवर मुलगा व मुलींमध्ये शारीरिक संबंध ठेवले जातील. तसेच, जर एखाद्या मुलाने एखाद्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले, तर पुढील जबाबदाऱ्यांचा सामना करण्याची तयारी त्याने ठेवायला हवी, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

एका महिलेने दाखल केलेल्या प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने ही बाब नमूद केली आहे. याप्रकरणात एका पीडित मुलीने तरुणावर बलात्काराचा आरोप लावला होता. लग्नाचे अमिष दाखवून युवकाने पीडित मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी, दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते, तसेच मुलगा मुस्लीम असल्याने मुलीच्या आई-वडिलांनीच या लग्नाला विरोध केला होता, असे आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. 

दरम्यान, मुलीकडील वकिलांनीही आपली बाजू मांडली. त्यामध्ये, आरोपीने 2018 पासून लग्नाचे अमिष दाखवून पीडितावर सातत्याने बलात्कार केला. त्यानंतर, लग्नासही नकार दिला. तसेच, दुसऱ्या मुलीसोबत लग्न होत असल्याचे समजताच पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, ही बाब फिर्यादीच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर, न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.   
 

Web Title: Girls should not have sexual relations if marriage is not finalized - High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.