नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सिव्हील सर्व्हिस परीक्षा- २०१९ चा निकाल आज जाहीर झाला आहे. या निकालांमध्ये प्रदी सिंह याने अव्वलस्थान पटकावले आहे. तर जतीन किशोर याने दुसरा आणि प्रतिभा वर्माने तिसरा क्रमांक पटकावला आहे. दरम्यान, यंदाच्या युपीएससीच्या निकालांमध्ये मुलींचा बोलबाला दिसून आला आहे. उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांमधील पहिल्या २० विद्यार्थ्यांमध्ये नऊ मुलींचा समावेश आहे.
यूपीएससीच्या नागरी सेवेच्या परीक्षेसाठी २० जुलैपासून मुलाखती सुरू झाल्या होत्या. दरम्यान, या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकूण ८२९ परीक्षार्थींना नियुक्ती पत्र पाठवण्यात येणार आहे. विभाग निहाय निकाल पाहिल्यास ३०४ सामान्य, ७८ ईडब्ल्यूएस, २५१ ओबीसी, १२९ एससी आणि ६७ एसटी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यूपीएससीच्या निकालांमध्ये उत्तीर्ण झालेले अव्वल २० विद्यार्थी
१ - प्रदीप सिंह
२ - जतीन किशोर
३ - प्रतिभा वर्मा
४ - हिमांशू जैन
५ -जयदेव सीएस
६ - विशाखा यादव
७ - गणेश कुमार भास्कर ८ - अभिषेक सराफ
९ - रवी जैन
१० - संजिता मोहपात्रा
११ - मुकुल गोयल
१२ - अजय जैन
१३ - रौनक अग्रवाल
१४ - अनमोल जैन
१५- नेहा प्रकाश भोसले
१६ - गुंजन सिंह
१७ - स्वाती शर्मा
१८ -लविश ओर्डिया
१९ - श्रेष्ठा अनुरूप
२० - नेहा बॅनर्जी