Gita Gopinath Meets Pm Narendra Modi : जगात लस न्याय्य प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा धोका अधिक गंभीर झाला आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (आयएमएफ) भारतीय-अमेरिकन मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी म्हटले.
वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गोपीनाथ यांनी लस उत्पादक आणि विकसित देशांनी ज्या गरीब देशांना लस गरजेची आहे त्यांना लवकरात लवकर ती उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे यावर भर दिला. लसीची उपलब्धता अन्यायकारक आहे. वर्ष २०२१ आता संपण्याच्या टप्प्यावर असून, उच्च उत्पन्नाच्या देशांनी त्यांच्या लोकसंख्येपैकी ७० टक्क्यांचे लसीकरण केले आहे आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये चार टक्क्यांपेक्षाही कमी लसीकरण झाले आहे. २०२१च्या अखेरपर्यंत प्रत्येक देशातील ४० टक्के लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य होते. ८० देशांनी हे लक्ष्य गाठलेले नाही. बहुसंख्य देशांकडे पुरेशा प्रमाणात लस नाही,’ असे गीता गोपीनाथ म्हणाल्या.
गोपीनाथ - मोदी यांची भेटगीता गोपीनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी भेट घेतली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने गोपीनाथ या पहिल्या उपमहासंचालक म्हणून असतील, असे जाहीर केल्यावर ही भेट झाली. गोपीनाथ या जिओफ्रे ओकामोटा यांच्या जागी येतील. गोपीनाथ यांनी आयएमएफच्या मुख्य अर्थशास्रज्ञ म्हणून ३ वर्षे काम केलेले आहे.