नवी दिल्ली : प्रेमाचे प्रतीक असलेला व्हॅलेंटाइन डे अगदी जवळ आला आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्वांच्या पसंतीचा आणि सोयीचा पर्याय म्हणजे गुलाबाचे फूल. हे फुल कुठेही सहजपणे उपलब्ध असते. जवळच्या व्यक्तिला अगदी खास आणि महागडा गुलाब द्यायचा असेल तरी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. फक्त त्यासाठी खिसा रिकामी करण्याची तयारी ठेवावी लागेल.
ज्युलिया चाइल्ड : हा गुलाब गोड सुगंध आणि मोठ्या पिवळ्या पाकळ्यांसाठी ओळखला जातो. प्रसिद्ध अमेरिकन शेफचे नाव याला दिलेले आहे. संकरित झाडाला ही फुले येतात. एका गुलाबाची किंमत चार हजार युरो म्हणेजे ३.५ लाख रुपये आहे.
गार्डन ऑफ अल्लाह : हे जगातील सर्वांत महागडे गुलाबाचे फूल आहे. झुपकेदार पाकळ्या आणि मादक सुगंध ही याची वैशिष्ट्ये आहेत. मखमली पाकळ्या असलेल्या या गुलाबाची किंमत पाच हजार युरो म्हणजे ४.५ लाख रुपये इतकी आहे.
मिस्टर लिंकन : मोठ्या लाल पाकळ्यांसाठी हा गुलाब प्रसिद्ध आहे. ही फुले खूप दुर्मीळ आहेत. एक गुलाब तीन हजार युरो म्हणजे २.५ लाखांना मिळतो.
सर्वांत महागडा ‘प्रपोज’
आयुष्यभर स्मरणात राहावा, यासाठी अभिनव पद्धतीने व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची क्रेझ सध्या जगभर आहे. काही कंपन्या कपल्ससाठी ‘प्रपोज डे’ प्लान करतात.
‘माय प्रपोजल’ ही ऑस्ट्रेलियातील कंपनी प्रपोजसाठी दीड हजार गुलाबांची सजावट केलेला खास डायनिंग रुम उपलब्ध करून देते. यासाठी ८१ हजार रुपये ते ११ लाख इतके शुल्क आकारते.
कॅलिफोर्नियातील ‘द हार्ट बँडिट्स’ ही कंपनी कपल्ससाठी गुलाबांपासून ७ फूट उंचीचा आयफेल टॉवर बनविते. कंपनीने या प्रपोजलसाठी एका कपलकडून ६३ लाख रुपये घेतले होते. आजवरचा हा सर्वांत महागडा प्रपोज ठरला आहे.