भाजपाला दे धक्का; आमदार प्रकाश भाई पटेलांनी सोडली साथ; काँग्रेसचा गमछा गळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 12:40 PM2024-03-20T12:40:21+5:302024-03-20T12:43:41+5:30
आज भाजपाच्या एका आमदाराने काँग्रेसचा हात जवळ केला आहे. जय प्रकाश भाई पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे भाजपात प्रवेश केला आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच राजकीय पक्षात उमेदवारांची आदलाबदली आणि पक्षांतराच्या घटनांनी जोर धरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणाताही मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. दुसरीकडे झारखंडमध्ये सत्ताधारी JMM(झारखंड मुक्ती मोर्चा) ला मंगळवारी मोठा धक्का बसला. JMM प्रमुख शिबू सोरेन यांची मोठी सून आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मोठ्या भावाची पत्नी सीता सोरेन, यांनी BJP मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यानंतर, आज भाजपाच्या एका आमदाराने काँग्रेसचा हात जवळ केला आहे. जय प्रकाश भाई पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे भाजपात प्रवेश केला आहे.
भाजप झारखंडचे प्रभारी आणि राज्यसभा खासदार लक्ष्मीकांत वाजपेयी आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सीता सोरेन यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले. तर, भाजपा आमदार जय प्रकाश भाई पटेल यांनीही आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पटेल हे झारखंडच्या मांडू विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर आणि प्रभारी गुलाम अहमद मीर यांच्या उपस्थितीत पटेल यांनी काँग्रेसोबत हातमिळवणी केली. प्रकाश भाई पटेल काँग्रेसमध्ये सहभागी झाल्याने निश्चित पक्षाचा फायदा होईल, असे मंत्री गुलाम अहमद यांनी म्हटले आहे.
#WATCH | BJP leader Jai Prakash Bhai Patel joins the Congress in Delhi. pic.twitter.com/kB909gFGBr
— ANI (@ANI) March 20, 2024
मी २०१९ च्या लोकसभा विधानसभेत केवळ भाजपासाठीच नाही, तर एनडीए आघाडीसाठी प्रचार केला होता. आम्हाला वाटलं झारखंडच्या विकासासाठी काम केलं जाईल. तेव्हा, माझे वडिल टेक लाल मेहतो यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे, एनडीएमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे व्हिजन पुढे नेले जाईल, असे वाटले होते. मात्र, तसे झाले नाही, असे प्रकाश भाई पटेल यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करतेवेळी म्हटले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून हजारीबाग मतदारसंघातून प्रकाश भाई पटेल यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. भाजपाने या मतदारसंघातून मनीष जयस्वाल यांना उमेदवारी घोषित केली आहे.