शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

भाजपाला दे धक्का; आमदार प्रकाश भाई पटेलांनी सोडली साथ; काँग्रेसचा गमछा गळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 12:40 PM

आज भाजपाच्या एका आमदाराने काँग्रेसचा हात जवळ केला आहे. जय प्रकाश भाई पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे भाजपात प्रवेश केला आहे. 

नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच राजकीय पक्षात उमेदवारांची आदलाबदली आणि पक्षांतराच्या घटनांनी जोर धरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणाताही मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. दुसरीकडे झारखंडमध्ये सत्ताधारी JMM(झारखंड मुक्ती मोर्चा) ला मंगळवारी मोठा धक्का बसला. JMM प्रमुख शिबू सोरेन यांची मोठी सून आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मोठ्या भावाची पत्नी सीता सोरेन, यांनी BJP मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यानंतर, आज भाजपाच्या एका आमदाराने काँग्रेसचा हात जवळ केला आहे. जय प्रकाश भाई पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे भाजपात प्रवेश केला आहे. 

भाजप झारखंडचे प्रभारी आणि राज्यसभा खासदार लक्ष्मीकांत वाजपेयी आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सीता सोरेन यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले. तर, भाजपा आमदार जय प्रकाश भाई पटेल यांनीही आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पटेल हे झारखंडच्या मांडू विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर आणि प्रभारी गुलाम अहमद मीर यांच्या उपस्थितीत पटेल यांनी काँग्रेसोबत हातमिळवणी केली. प्रकाश भाई पटेल काँग्रेसमध्ये सहभागी झाल्याने निश्चित पक्षाचा फायदा होईल, असे मंत्री गुलाम अहमद यांनी म्हटले आहे. 

मी २०१९ च्या लोकसभा विधानसभेत केवळ भाजपासाठीच नाही, तर एनडीए आघाडीसाठी प्रचार केला होता. आम्हाला वाटलं झारखंडच्या विकासासाठी काम केलं जाईल. तेव्हा, माझे वडिल टेक लाल मेहतो यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे, एनडीएमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे व्हिजन पुढे नेले जाईल, असे वाटले होते. मात्र, तसे झाले नाही, असे प्रकाश भाई पटेल यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करतेवेळी म्हटले. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून हजारीबाग मतदारसंघातून प्रकाश भाई पटेल यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. भाजपाने या मतदारसंघातून मनीष जयस्वाल यांना उमेदवारी घोषित केली आहे.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकJharkhandझारखंडjharkhand lok sabha election 2024झारखंड लोकसभा निवडणूक निकाल २०२४