नवी दिल्ली : देशात सध्या पोलीस दलात ५ लाख जागा रिक्त असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी काळजी व्यक्त करून सगळ्या राज्यांच्या गृह सचिवांना त्यांनी सर्व थरातील रिक्त जागांचा तपशील चार आठवड्यांत सादर करण्याचा आदेश दिला. रिक्त जागांचा विषय हा महत्त्वाचा असल्याचे सांगून मुख्य न्यायमूर्ती जे. एस. खेहार यांच्या नेतृत्वाखालील एन. व्ही. रामना आणि डी. वाय. चंद्रचुड यांच्या खंडपीठाने कोणत्याही राज्याने तपशिलाचे शपथपत्र सादर केले नाही, तर सर्वोच्च न्यायालय संबंधित गृहसचिवाला पाचारण करीन, असे स्पष्ट केले. आमच्या आदेशाचे पालन होण्यासाठी केंद्र सरकारला त्याने सगळ्या राज्यांच्या गृह सचिवांना एक आठवड्यात निरोप द्यावा, असे खंडपीठाने म्हटले. जानेवारी २०१५मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार सुमारे ४.७३ लाख जागा रिक्त आहेत, असे न्यायालयाने म्हटले.
पोलिसांच्या रिक्त जागांचा तपशील द्या
By admin | Published: January 25, 2017 12:53 AM