ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 18 - कर्नाटकमधल्या कॉंग्रेसप्रणीत सरकारने वेगळा झेंड्याची मागणी केली आहे. यासाठी राज्य सरकारने 9 सदस्यांची ध्वज समिती स्थापन केली आहे. यापुर्वी 2012 मध्येही कर्नाटकमधून स्वतंत्र ध्वाजाची मागणी करण्यात आली. पण केंद्रातील तत्कालिन सरकारने ही मागणी फेटाळली होती. असं केल्यास देशातील एकता आणि अखंडताचा भंग ठरेल असं म्हणत ही मागणी वाजपेयींनी फेटाळली होती. त्यानंतर आता पुन्हा या मागणीने डोकं वर काढलं आहे.
कर्नाटकमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी झेंड्याचा आराखडा बनवण्यासाठी एक ९ सदस्यांची समितीही स्थापन करण्याता आली आहे. या समितीचे अध्यक्षपद कर्नाटकच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुखांकडे सोपवण्यात आले आहे. आता ही समिती झेंड्याचा आराखडा बनवून राज्य सरकारला सोपवेल. वेगळा झेंडा बनवण्याची कर्नाटक सरकारचा घाट यशस्वी झाल्यास जम्मू काश्मीरनंतर स्वतंत्र ध्वज असणारे कर्नाटक हे देशातील दुसरे राज्य ठरू शकते. असे झाल्यास अन्य राज्यांकडूनही स्वतंत्र ध्वजाची मागणी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र कर्नाटक सरकारच्या या योजनेस भाजपाकडून विरोध होत आहे. राज्याच्या दुसरा ध्वज बनवल्यास तिरंग्याचे महत्त्व कमी होईल. तसेच त्यातून अखंडतेच्या भावनेला धक्का लागेल, असेही काही जणांचे मत आहे. तर केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनीही या मागणीस विरोध केला आहे.