शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

सर्वांना मोफत लस द्या, ‘सेंट्रल विस्टा’ थांबवा, १२ विरोधी पक्षांचे पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 6:06 AM

नवे संसद भवन तसेच पंतप्रधानांचे निवासस्थान यांचा समावेश असलेल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवून यासाठी निर्धारित केलेल्या निधीतून ऑक्सिजन आणि लस यांसारख्या जीवना‌वश्यक बाबींची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात केली आहे.

शीलेश शर्मा - नवी दिल्ली : कोरोनावरील लस देशात तयार केलेली असो किंवा परदेशातून आयात केलेली, देशातील प्रत्येक नागरिकाला ती मोफत दिली जावी आणि राजधानीत सुरू असलेल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेससह विरोधी पक्षांतील १२ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.  देशातील नागरिकांना मोफत लस देण्यासाठी केंद्र सरकारने सर्व प्रकारे प्रयत्न करावेत, असे यात म्हटले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. या निधीचा वापर मोफत लस देण्यात केला जावा, असे यात सुचविले आहे. (Give Free vaccines to all, stop 'Central Vista', letter of 12 Opposition parties to PM)नवे संसद भवन तसेच पंतप्रधानांचे निवासस्थान यांचा समावेश असलेल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवून यासाठी निर्धारित केलेल्या निधीतून ऑक्सिजन आणि लस यांसारख्या जीवना‌वश्यक बाबींची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर पक्षांचे नेते ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन, हेमंत सोरेन, फारुख अब्दुल्ला, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, डी. राजा आणि सीताराम येच्युरी यांनी पंतप्रधानांना हे पत्र लिहिले आहे. यात अशी मागणी केली आहे की, पीएम केअर या नावाखाली स्थापन केलेल्या खासगी ट्रस्टमध्ये बेकायदा जो पैसा गोळा करण्यात आला आहे, त्यातून कोरोना काळात रोजगार गमावलेल्यांना प्रति महिना सहा हजार रुपये दिले जावेत, तसेच गरजवंतांना रेशन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. या नेत्यांनी पत्रात असेही म्हटले आहे की, या मागण्यांची पूर्तता केली जावी आणि देशहितासाठी या पत्राचे उत्तर सार्वजनिक केले जावे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदSonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवारCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे