नवी दिल्ली: डॉक्टरांवर होत असलेल्या अनेक खटले हे न्यायप्रविष्ट आहेत. हे खटले निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष न्यायालयाची स्थापना करुन ते जलद गतीने निकाली काढावेत. त्याचबरोबर कोरोना काळात सेवा बजावित असताना मृत्यू झालेल्या डॉक्टरांना शहीद दर्जा द्यावा, अशी मागणी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज संसदीय अधिवेशनात केली आहे.ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोणचे नाव येताच कंगनाने साधला निशाणा; म्हणाली, रिपीट आफ्टर मी...!
संसदीय अधिवेशनात आरोग्य विषय विधेयकावर चर्चेच्या दरम्यान खासदार शिंदे यांनी उपरोक्त मागणी केली. खासदार शिंदे यांनी सांगितले की, डॉक्टरांवरील हल्ल्याच्या 32 लाख केसेस न्यायप्रविष्ट आहे. त्यापैकी 9 लाख केसेस या दिवाणी स्वरुपाच्या असून 23 लाख केसेस फौजदारी स्वरुपाच्या गंभीर आहेत. 10 टक्के खटले हे गेल्या दहा वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे. हे खटले निकाली काढण्याचा एक वर्षाचा कालावधीत घट करुन तो कालावधी आणखी कमी करावा. 3 महिन्यांत हे खटले निकाली काढण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. टेकडावर जन्मलेल्या नटीनं शेतीवर बोलावं यापेक्षा मोठा विनोद कोणता?; शेट्टींचा कंगनावर निशाणा
कोराना आपत्ती काळात डॉक्टर, पॅरामॅडिकल स्टाफ, पोलीस यांनी त्यांचा जीव धोक्यात घालून कुटुंबापासून दूर राहून सेवा कार्य व कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे आज भारताची लोकसंख्या 135 कोटींच्या घरात असताना देखील भारतात मृत्यूचा दर कमी आहे. हे डॉक्टर व पॅरामेडीकल स्टाफ यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे शक्य झाले आहे. कोरोना काळात सेवा बजाविणाऱ्या 500 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तर 50 हजार पेक्षा जास्त डॉक्टर बाधित झालेले आहे. त्यामुळे केवळ अनुभवी डॉक्टरच नव्हते. तर नुकतेच पदवी ग्रहण केलेल्या नवख्या डॉक्टरांचाही समावेश आहे. कोरोना काळात सेवा देताना मृत्यू झालेल्या डॉक्टरांना शहिदाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी यावेळी खासदार शिंदे यांनी सरकारकडे केली आहे. ही सूचना त्यांनी आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. कोरोना काळात कोरानाचे रुग्ण शोधून काढण्यासाठी आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांनी जीवाची पर्वा न करता सर्वेक्षणाचे काम केले आहे. ही मंडळी डेली व्हेजेसवर काम करतात. त्यांना पगार देण्यात यावा. तसेच ग्रुप सी चा दर्जा दिला जावा अशी मागणी खासदारांनी केली.
तसेच जीएसटीचा परतावा महाराष्ट्र राज्याला लवकर मिळावा जेणे करुन कोरोनाशी सामना करताना राज्याला निधीची अडचण भासू नये अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे.