शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मला एक संधी द्या!

By admin | Published: August 28, 2016 5:20 AM

‘काश्मीर खोऱ्यातील रस्त्यांवर उतरलेल्या निदर्शकांनी मला स्थिती सुधारण्यासाठी एक संधी द्यावी, अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार

नवी दिल्ली : ‘काश्मीर खोऱ्यातील रस्त्यांवर उतरलेल्या निदर्शकांनी मला स्थिती सुधारण्यासाठी एक संधी द्यावी, अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मदत करतील, अशी मला आशा आहे, पण काश्मीर प्रश्न केवळ चर्चेनेच सुटू शकतो, रस्त्यांवर आंदोलने आणि हिंसाचार करून सुटू शकत नाही, हे लक्षात घेऊन सर्व आंदोलकांनी चर्चेसाठी पुढे यावे,’ असे आवाहन जम्मू व काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी केले.मेहबुबा मुफ्ती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत दोघांत सविस्तर चर्चा झाली. त्या बैठकीनंतर त्या म्हणाल्या की, ‘काश्मीरमध्ये पीडीपी-भाजपाचे सरकार आल्यापासून हिंसाचार उफाळला, हे खरे नाही. काश्मिरात २00८ पासून अस्वस्थता आहे. पाकिस्तानातून दहशतवादी खोऱ्यात येऊन स्थिती आणखी बिघडवत आहेत. केंद्रातील आधीच्या यूपीए सरकारने काश्मीरच्या समस्येकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच आज स्थिती इतकी चिघळली आहे.’पाकिस्तानला चर्चेत सहभागी करापुढील आठवड्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काश्मीरला भेट द्यावी, जम्मू-काश्मीरचा राज्यपाल बदलण्यात यावा आणि समस्येशी संबंधित सर्व पक्षांशी चर्चा करण्यासाठी मध्यस्थाची नेमणूक करावी, असे तीन मुद्दे मेहबुबा यांच्या योजनेत आहेत. या चर्चेत पाकिस्तानलाही सहभागी करून घेण्यात यावे, असाही मेहबुबा यांचा आग्रह आहे. काश्मीर प्रश्नाला भू-राजकीय बाजू आहेत. यामुळे फुटीरवादी गट आणि पाकिस्तानला चर्चेत सहभागी करून घेण्याची सूचना मेहबुबा यांनी केल्याचे निवेदनात म्हटले आहे. काश्मिरींना पाकिस्तान नकोचकाश्मीरमधील लोकही अस्थैर्य, अशांतता, संचारबंदी, हिंसाचार या साऱ्याला कंटाळून गेली आहे. राज्यातील ९५ टक्के लोक या साऱ्याच्या विरोधात असून, केवळ ५ टक्केच लोक गडबड करीत आहेत आणि पाकिस्तान त्या आगीत तेल ओतत आहे. काश्मीरचा आणि पाकिस्तानचा अजिबात संबंध नाही. काश्मिरी लोकांना पाकमध्ये जाण्याची वा वेगळे होण्याची अजिबात इच्छा नाही, असे त्या म्हणाल्या. संबंध सुधारण्याची संधी पाकिस्तान वारंवार गमावत आहे. राजनाथ सिंग यांच्याशी बोलण्याचे टाळून पाकने संधी गमावती. त्या आधी मोदी पाकला जाऊन आल्यानंतरही पाकने पठाणकोटवर हल्ला केला. मोदींकडून आशा आहे...दहशतवादी शक्तींना फुटीरांचा पाठिंबा आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, ‘असे पूर्वापार घडत आले आहे, पण आता नरेंद्र मोदी सरकारकडे संसदेत दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे काश्मीरमधील परिस्थिती बदलण्याची त्यांना पुरेपूर संधी आणि शक्यता आहे. त्यांच्याकडून काश्मीरमध्ये बदल घडून आला नाही, तर मग कधीच काश्मीरची स्थिती सुधारणे शक्य होणार नाही. त्यामुळेच मोदींकडून मला खूप आशा आहे.’पीडीपी-भाजपा सरकार वाजपेयी यांनी आखलेल्या धोरणानुसार काश्मीर प्रश्नावर काम करीत आहे. काश्मीर प्रश्नात संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला सध्याच्या स्थितीत कोणतेच स्थान नाही, असे जनरल परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले होते. हीच भूमिका पाकिस्तानने पुढे चालवावी. - मेहबुबा मुफ्ती