सासूला घेऊन जावई पळून गेल्याच्या घटनेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रकरणात आता रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राहुल त्याची होणारी सासू अनिता देवी हिच्याशी फोनवर बोलत असला तरी, त्याने सासरे जितेंद्र यांच्या तब्येतीचीही अनेक वेळा विचारपूस केली होती. जितेंद्रने दिलेल्या माहितीनुसार, राहुलने स्वतः त्याला नवीन फोन घेऊन देण्यास सांगितलं होतं. अनेक वेळा विनंती केल्यानंतर मी राहुलला एक नवीन फोन घेतला. नवीन फोन घेतल्यानंतर तो त्याच्या सासूशी बोलू लागला आणि तिच्याचसोबत पळून गेला.
जितेंद्रने सांगितलं की, "राहुल म्हणाला, पप्पा, कृपया मला एक मोबाईल घेऊन द्या कारण माझा फोन खराब झाला आहे. ज्यावर आम्ही लग्नात नवीन मोबाईल देऊ असे सांगितलं. पण राहुल ऐकायला तयार नव्हता, त्याने अनेक वेळा नवीन फोन मागितला. मग आम्ही एकमेकांशी बोललो आणि त्याच्यासाठी नवीन फोन घेतला. त्यानंतर तो अनिताशी त्याच फोनवरून तब्बल वीस तास बोलत असे. त्याला १ तारखेला नवीन फोन घेऊन दिला आणि ६ तारखेला दोघे पळून गेले."
"आम्ही आमच्या अनेक नातेवाईकांसह राहुलच्या घरी गेलो होतो. राहुल आणि त्याच्या वडिलांशीही बोललो. सर्वांना राहुल आवडला. यानंतर राहुलचं लग्न ठरलं होतं. आम्हाला वाटत होतं की, लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. आम्ही मुलीची पाठवणी करू, राहुल तिला घेऊन जाईल, पण इथे उलट घडलं, तो माझ्या पत्नीला घेऊन पळून गेला."
"राहुलच्या बहिणीची नवरा रुद्रपूर येथे राहतो. तो मेहंदी काढण्याचं काम करतो. राहुल त्याच्याकडे गेला होता. दोघांमध्ये चांगली मैत्री देखील आहे. राहुलच्या बहिणीचा नवराही अनिताशी दोन-तीन वेळा फोनवर बोलला होता. अनिताचा नंबर त्याच्याकडे सेव्ह होता. राहुलने त्याच्याकडून अनिताचा नंबर घेतला आणि मग बोलू लागला." या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.