बडोदा : बडोद्याच्या विमानतळाला दूरदर्शी राजे सयाजीराव गायकवाड (तृतीय) यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. अत्यंत पुरोगामी म्हणून ओळखले जाणारे आणि आधुनिक बडोद्याचे निर्माते असलेले सयाजीराव गायकवाड यांनी १८७५ ते १९३९ या काळात बडोद्याच्या संस्थानाचे नेतृत्व केले होते. रामदास आठवले म्हणाले की, या विमानतळाचे नाव जर सयाजीराव गायकवाड यांच्या नावाने ठेवले तर बडोद्याच्या आधुनिक निर्मात्याला वाहिलेली ही श्रद्धांजली ठरेल. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सयाजीराव गायकवाड यांच्या काळात बडोदा हे शैक्षणिक केंद्र होते, असे सांगून आठवले म्हणाले की, सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळात अनेकांना पुढे जाण्याचा मार्ग दाखविला होता. यात दादाभाई नौरोजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश होता.शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक आणि कृृषि क्षेत्रातही सयाजीराव गायकवाड यांचे मोठे योगदान होते. बडोद्यातील कपडा उद्योगाच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. बालविवाहावर प्रतिबंध, अस्पश्यृता संपविण्यासाठी प्रयत्न, संस्कृतचा विकास, कलाकारांना प्रोत्साहन आदी अनेक कार्य सयाजीराव गायकवाड यांनी केल्याचेही आठवले यांनी सांगितले. सयाजीराव गायकवाडांचे हे योगदान पाहता त्यांचे नाव या विमानतळाला द्यावे, अशी मागणी आठवले यांनी केली. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आठवले आले होते. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी १६० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. शैक्षणिक कार्य मोठेसयाजीराव गायकवाड यांच्या काळात बडोदा हे शैक्षणिक केंद्र होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेकांना पुढे जाण्याचा मार्ग दाखविला होता. यात दादाभाई नौरोजी आणि डॉ. आंबेडकर यांचाही समावेश होता.
बडोदा विमानतळाला सयाजीरावांचे नाव द्या
By admin | Published: September 25, 2016 2:58 AM