कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दोन महिला कुस्तीपटूंनी आरोप केले आहेत. आता या संदर्भात दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पुरावा म्हणून फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ देण्यास सांगितले आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दाखल केलेल्या FIR नुसार, लैंगिक छळाच्या या घटना 2016 ते 2019 दरम्यान WFI ऑफिस 21, अशोका रोड येथे आणि परदेशातील स्पर्धांदरम्यान घडल्या. सिंह यांच्या खासदार निवासस्थानाचा पत्ता WFI कार्यालय आहे.
मित्रांनी साथ सोडल्याने भाजपची चिंता वाढली; शिवसेना वगळता मोठा पक्ष मदतीला नाही
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 5 जून रोजी सीआरपीसीच्या कलम 91 अंतर्गत महिला कुस्तीपटूंना स्वतंत्र नोटीस बजावण्यात आली होती आणि त्यांना उत्तर देण्यासाठी एक दिवसाची वेळ देण्यात आली होती. या संदर्भात एका कुस्ती पटूने सांगितले की, 'आम्ही आमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते दिले आहेत. आमच्या एका नातेवाईकानेही पोलिसांना जे मागितले ते दिले आहे.
आता या आरोपाचे सर्व पुरावे पोलिसांनी मागितले आहेत. 7 जून रोजी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर कुस्तीपटूंनी 15 जूनपर्यंत त्यांचा विरोध थांबवण्याचे मान्य केले. 15 जून रोजी दिल्ली पोलीस या प्रकरणी आरोपपत्र दाखल करणार आहेत. पोलिसांनी तक्रारकर्त्यांना कथित घटनांची तारीख आणि वेळ, WFI कार्यालयात घालवलेला वेळ आणि त्यांच्या रूम मेट आणि इतर संभाव्य साक्षीदारांची नावे सादर करण्यास सांगितले आहे. डब्ल्यूएफआय कार्यालयात जाताना कुस्तीपटू ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलचा तपशीलही पोलिसांनी मागवला आहे.