Coronavirus : त्यांना कर्ज देणारं पॅकेज नको, तर खिशात पैसा द्या, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 02:07 PM2020-05-16T14:07:37+5:302020-05-16T14:34:38+5:30
लोक रस्त्यावर तहान-भुकेने चालत आहेत, त्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचं मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी व्यक्त केलं आहे.
नवी दिल्लीः देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्यानं संक्रमितांची संख्यासुद्धा वाढतीच आहे. अनेक मजुरांनी लॉकडाऊन असल्यानं आपापल्या राज्यांचा मार्ग धरला आहे. परंतु इतर राज्यांतून आपापल्या घरी जाण्यासाठी मजुरांना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकरी, मजुरांचं हाल होत आहेत, त्यांना कर्ज देणारं पॅकेज नको, त्यांच्या खिशात पैसा द्यायला हवा, लोक रस्त्यावर तहान-भुकेने चालत आहेत, त्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचं मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी व्यक्त केलं आहे.
शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे, त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करू नका, ते रेटिंग नंतर सुधारू शकेल, सध्या भारताच्या मजूर, शेतकऱ्यांच्या काळजीचा विषय, ते सध्या संकटात आहेत, त्यांना आधार द्या रेटिंग आपोआप सुधारेल, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला हाणला आहे. सध्या मजूर आणि शेतकऱ्यांना किमान तात्पुरता दिलासा आवश्यक आहे, त्यांच्या हातात रोख रक्कम देणं गरजेचे आहे. लॉकडाऊन समजुतीने आणि काळजी घेऊन उठवावा लागेल, दक्षतेने उठवायला हवा, हा कोणता इव्हेंट नाही, वृद्ध, व्याधीग्रस्तांची खबरदारी घेऊन लॉकडाऊन उठवावा लागेल, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी मागणी आणि पुरवठ्याचं गणित सुधारण्यासाठी गरिबांना पैसे देणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. लोकांच्या खिशात पैसा नसेल तर लोकं काय खाणार?, मागणी आणि पुरवठ्याचं गणित सुधारण्यासाठी पैसे देणं गरजेचं, पैसे राज्य सरकार अथवा केंद्र सरकारमार्फत द्या किंवा कसेही द्या, पण पैसे द्या, असंही राहुल गांधींनी मोदी सरकारला सांगितलं आहे. सरकारनं रेटिंग्स, जगातील प्रतिमेचा विचार आज करू नये, शेतकरी, मजूर, महिला, तरुण देशाचं रेटिंग्स बनवतात. सरकारने पॅकेजचा पुनर्विचार करावा, शेतकरी, मजुरांच्या खिशात पैसे द्यावेत, असंही राहुल गांधींनी सांगितलं आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कौतुकास्पद! एका रुपयात इडली विकणार्या अम्माला शेफ विकास खन्नांचं सरप्राईज गिफ्ट
गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाक राबवत असलेल्या योजनांना भारताचा विरोध; इम्रान सरकारला दिला गंभीर इशारा
Lockdown 4.0चं काऊंटडाऊन; आपल्या राज्याला कुठल्या सवलती मिळणार?
CoronaVirus news : कोरोनाच्या समूह संसर्गाची भीती, लॉकडाऊन हटवणं पडू शकतं महागात- तज्ज्ञ
अमेरिका मैत्रीला जागला! भारताला व्हेंटिलेटर देणार अन् मिळून कोरोनाला हरवणार
प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक, 24 जणांचा मृत्यू
...म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे, शिवसेनेचा भाजपाला टोला