जि.प.ला १०० हेक्टर पर्यंतच्या सिंचनाची कामे द्या
By admin | Published: February 11, 2015 11:19 PM
सरकारकडे मागणी : जिल्ातील कामांना गती मिळणार
सरकारकडे मागणी : जिल्ह्यातील कामांना गती मिळणारनागपूर : जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी ० ते १०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेल्या तलाव व बंधाऱ्यांची कामे जिल्हा परिषदेला देण्यात यावी, अशी पदाधिकारी व सदस्यांची मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे.गत काळात १०० हेक्टरपर्यंत क्षमता असलेल्या सिंचन प्रकल्पांची कामे जि.प.च्या माध्यमातून केली जात होती. परंतु मागील काही वर्षांपासून ही कामे लोकल सेक्टर(स्थानिक स्तर) विभागाच्या माध्यमातून केली जातात. ग्रामीण भागात पंचायत समित्या व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जि.प.चे सर्वत्र जाळे आहे. सक्षम यंत्रणा असूनही ही कामे करण्याचे अधिकार काढून घेतले.सिंचन विभागाप्रमाणेच कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना जि.प.च्या कृषी विभागामार्फत न राबविता त्या राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत राबविल्या जातात. योजना राबविताना जि.प.सदस्य व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे गरजूंना अशा योजनांचा लाभ मिळत नसल्याची सदस्यांची तक्र ार आहे. सर्वसाधारण सभा, स्थायी समितीत हा प्रश्न सदस्यांकडून वेळोवेळी उपस्थित केला जातो. परंतु शासन स्तरावर पुरेसा पाठपुरावा न झाल्याने ही कामे जि.प.ला परत मिळालेली नाही.(प्रतिनिधी)चौकट...सिंचन क्षमता घटलीजिल्ह्यात १२३ लघु सिंचन तलाव, ६३ पाझर तलाव, ३९ गाव तलाव, २१४ मालगुजारी तलाव, ८८७ साठवण बंधारे, ७२८ कोल्हापुरी बंधारे आहेत. परंतु यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. लोकल सेक्टरकडून यावर निधी खर्च केला जात नाही. दुसरीकडे जि.प.च्या सिंचन विभागाकडे निधी नसल्याने साठवण क्षमता कमी होऊ न सिंचन घटले आहे.चौकट...पालकमंत्र्यांकडे मागणी १०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेल्या तलाव व बंधाऱ्यांची कामे करण्याचे अधिकार जि.प.च्या सिंचन विभागाला परत मिळावे, अशी मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली असल्याची माहिती अध्यक्ष निशा सावरकर यांनी दिली.