बेंगळुरू : लोकसभेचे तिकीट देतो, २५ लाख रुपये द्या असे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे भाऊ आणि बहिणीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. जनता दलाच्या (धर्मनिरपेक्ष) माजी आमदाराच्या पत्नीने याबाबत तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी जोशी यांचा भाऊ गोपाळ जोशी व बहीण विजयालक्ष्मी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गोपाळ यांच्या मुलाचाही एफआयआरमध्ये उल्लेख आहे.
तिकीट न मिळाल्याने त्या गोपाळशी बोलल्या. मात्र, मला २०० कोटी रुपयांचा प्रकल्प मिळणार आहे, त्यानंतर मी तुमचे पैसे परत करतो, असे गोपाळने माजी आमदार देववंद फुलसिंह चव्हाण यांच्या पत्नी सुनीता चव्हाण यांना सांगितले. गोपाळने त्यांच्याकडे १.७५ कोटी रुपये मागितले होते, मात्र २५ लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते.