उत्तराखंडमधील मीणा गेटजवळ हिमकडा कोसळला! 57 मजूर बर्फाखाली दबले, शोध मोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:35 IST2025-02-28T14:35:26+5:302025-02-28T14:35:26+5:30
Glacier broke in uttarakhand: बद्रीनाथ गावापासून चार किमी अंतरावर हिमकडा कोसळल्याची घटना घडली आहे. ५७ मजूर बर्फाखाली दबले गेले आहेत.

उत्तराखंडमधील मीणा गेटजवळ हिमकडा कोसळला! 57 मजूर बर्फाखाली दबले, शोध मोहीम सुरू
Glacier broke in Uttarakhand updates: उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात प्रचंड बर्फवृष्टी सुरू आहे. त्यातच एक दुर्दैवी घटना घडली आहे. बद्रीनाथपासून ४ किमी अंतरावर असलेल्या माणा गावावर हिमकडा कोसळला आहे. या घटनेत बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनचे (BRO) ५७ कामगार बर्फाखाली दबले गेले आहेत. १० कामगारांना बाहेर काढण्यात येश आले असून, उर्वरित मजुरांचा युद्ध पातळीवर शोध सुरू करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बर्फाखाली दबल्या गेलेल्या कामगारांना बाहेर काढण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. यासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफच्या जवानांना बोलवण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन, आयटीबीपी आणि बीआरओची पथकेही शोध मोहिमेत सामील झाली आहेत. शोध मोहिमेला देण्यात आली असली, तर बर्फवृष्टी होत असल्याने व्यत्यय येत आहे.
उत्तराखंडमध्ये चामोली जिल्हा आहे. या जिल्ह्यात माणा नावाचे गाव आहे, हे गाव भारत आणि चीन सीमेजवळ आहे. बद्रीनाथपासून हे गाव चार किमी अंतरावर आहे.
नेमकं काय घडलं?
बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे बीआरओचे मजूर रस्त्यावरील मोकळे करण्याचे काम करत आहेत. बद्रीनाथहून माणाकडे जाणाऱ्या माणा गेटजवळ बीआरओची छावणी आहे. तिथेच अचानक हिमस्खलन झाले. हिमकडा छावणीवर कोसळला आणि ५७ कामगार गाडले गेले.
तातडीने शोध आणि मदत कार्य हाती घेण्यात आले. १० कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. जोशीमठ येथील हेलिपॅडवरून एसडीआरएफच्या पथकाला रवाना करण्यात आले. त्याचबरोबर एनडीआरएफच्या जवानांचीही मदत घेतली जात आहे.
प्रचंड बर्फवृष्टी होत असून, बद्रीनाथला जाणारा रस्ता जोशीमठापासून पुढे हनुमान चुट्टीपर्यंत बंद आहे.