नवी दिल्ली : भारतातील १४ टक्के जनता कुपोषित असल्याचे जागतिक भूक निर्देशांकाच्या यंदाच्या वर्षीच्या अहवालात म्हटले आहे. कुपोषणाच्या समस्या असलेल्या देशांमध्ये जागतिक भूक निर्देशांक यादीत भारत ९४व्या स्थानावर आहे.
कुपोषण रोखण्यासाठी भारतामध्ये असलेल्या योजनांची अत्यंत ढिसाळपणे अंमलबजावणी करण्यात येते. तिथे देखरेखीचा अभाव असतो. भारतातील कुपोषणाची समस्या गंभीर होण्यास तेथील मोठ्या राज्यांतल्या अव्यवस्थित कारभार कारणीभूत आहे असे जागतिक भूक निर्देशांकाच्या यंदाच्या अहवालात म्हटले आहे.
गेल्या वर्षी ११७ देशांच्या या यादीत भारत १०७व्या स्थानावर होता. भारताचे शेजारी देश बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तानमध्येही कुपोषणाच्या समस्येने गंभीर स्वरुप धारण केले आहे.
या यादीत बांगलादेश ७५व्या, पाकिस्तान ७८व्या तर म्यानमार ८८व्या स्थानावर आहे. नेपाळ व श्रीलंका हे अनुक्रमे ७३ व ६४ व्या क्रमांकावर आहेत. या दोन देशांमध्ये कुपोषणाची समस्या त्यांच्या शेजारी देशांइतकी गंभीर नाही. कुपोषणाची समस्या खोलवरभारतामध्ये ५ वर्षे वयाखालील बालकांमध्ये कुपोषितांचे प्रमाण ३७.४ टक्के आहे. कुपोषणाने मरण पावणाऱ्या बालकांचे प्रमाण ३.७ टक्के आहे. तर उंचीच्या तुलनेत कमी वजन असलेल्या बालकांचे प्रमाण १७.३ टक्के आहे. त्यावरून भारतामध्ये कुपोषणाची समस्या किती खोलवर रुजली आहे हे दिसून येते.बालमृत्यूचे प्रमाण झाले काही अंशी कमी - भारतामध्ये ५ वर्षांखालील बालकांमध्ये कुपोषितांचे प्रमाण - 37.4%कुपोषणाने होणारे मृत्यू - 3.7%कुपोषणामुळे बालकांची नीट वाढ न होण्याचे प्रमाण नेपाळ, बांगलादेश, भारत, पाकिस्तान या देशांमध्ये लक्षणीय आहे असे यासंदर्भात १९९१ ते २०१४ या कालावधीत गोळा केलेल्या माहितीवरून दिसून येते. या काळात भारतात पाच वर्षे वयाखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण काही अंशी कमी झाले.न्यूमोनिया, डायरिया आदी आजारांमुळे लहान मुले मरण पावण्याचे प्रमाण कमी झाल्याने हा बदल घडून आला.