शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

जगभरात सात वर्षांमध्ये वाघांच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 3:27 PM

अस्तित्वाला असलेला धोका मात्र अद्यापही कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगभरात गेल्या सात वर्षांमध्ये वाघांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. याबाबत भारत, नेपाळमध्ये उत्तम स्थिती आहे. वाघांची संख्या वाढली असली तरी त्यांच्या अस्तित्वाला असलेला धोका अद्याप कमी झालेला नाही, असा निष्कर्ष इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थेने केलेल्या एका पाहणीतून काढण्यात आला आहे. 

२०१५ साली जगभरात ३२०० वाघ होते. तो आकडा आता ४२०० वर गेला आहे. जगातील ७६ टक्के वाघ दक्षिण आशियामध्ये आढळून येते. भारत व नेपाळमध्ये वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रशियामध्ये वाघांच्या आकडेवारीत फारसा फरक पडलेला नाही. 

‘भारतातील वाघांची वाढती संख्या ही चांगली घटना’वाघविषयक तज्ज्ञ डॉ. जॉन गुडरिच यांनी सांगितले की, भारत, नेपाळ, थायलंडमधील अभयारण्यांमध्ये वाघांची वाढती संख्या ही चांगली बातमी आहे. मागील दशकांत वाघांच्या संख्येत जशी वाढ झाली तशीच स्थिती येत्या सात-आठ वर्षांतही कायम राहायला हवी. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थेने सध्या वाघाचा समावेश अस्तित्वाला धोका असलेल्या प्राण्यांच्या यादीत केला आहे.

अजूनही लक्ष्य पूर्ण झाले नाहीवाघांच्या घटत्या संख्येबाबत चर्चा करण्यासाठी २०१० साली रशियामध्ये जागतिक वाघ परिषद झाली होती. २०२२पर्यंत जगभरात वाघांचा आकडा ६ हजारांवर नेण्याचे लक्ष्य या परिषदेत ठरविण्यात आले होते. यंदाच्या वर्षी दुसरी जागतिक वाघ परिषद होणार आहे. त्यात वाघांची संख्या वाढविण्याबाबत आणखी उपाययोजनांवर चर्चा होईल.

जगभरातील वाघांची स्थिती शंभर वर्षांपूर्वी वाघांची संख्या १ लाख होती. ती आता ४२०० इतकी आहे.nभारतातील मणिपूर, जम्मू-काश्मीर, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम, हिमाचल प्रदेश, नागालँड येथून वाघाचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती आहे.nअफगाणिस्तान, अझरबैजान, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, उझबेकिस्तान, तुर्कस्थान, पाकिस्तान यासहित अनेक देशांतून वाघांचे अस्तित्व संपले आहे.

टॅग्स :Tigerवाघforestजंगल