मुंबई : भारतीय हवाई दलाचे देशवासीयांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेते, अभिनेते-अभिनेत्री आणि खेळाडूंकडूनही भारतीय सैन्याच्या बेधडक कारवाईला सलाम ठोकण्यात येत आहे. ‘मुलतानचा सुलतान’ वीरेंद्र सेहवागनेही टिष्ट्वटरवरून आपली प्रतिक्रिया देताना ‘दी बॉईज हॅव प्लेड व्हेरी वेल’ असे म्हटले आहे. तसेच, ‘सुधर जाओ वरना सुधार देंगे,’ असेही सेहवागने दहशतवाद्यांना सुनावले आहे.
भारतीय हवाई दलाकडून झालेल्या कारवाईनंतर सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. सेहवागपाठोपाठ भारतीय संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी यानेही भारतीय सैन्याचे कौतुक करताना ‘दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले,’ असेही त्याने म्हटले. कांबळीने पुढे म्हटले की, ‘यापुढे भारतावर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांना दोनदा विचार करावा लागेल.’ माजी फंलदाज हेमांग बदानीनेही टिष्ट्वट करून ‘हाऊ इज द जोश’ म्हटले.
माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने, ‘भारतीय हवाई दलाला सलाम, शानदार...’ असे टिष्ट्वट केले. स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलने ‘गली बॉय’ स्टाईलमध्ये पोस्ट करताना ‘इंडियन एअर फोर्स, बहोत हार्ड.. बहोत हार्ड...’ असा मेसेज केला. ‘फुलराणी’ सायना नेहवालने म्हटले, ‘आपल्या इंडियन एअर फोर्सला खूप मोठा सलाम. जय हिंद.’ बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत म्हणाला, ‘भारतीय हवाई दलाला सलाम. दहशतवादाला त्यांनी जोरदार उत्तर दिले. प्रत्येक भारतीयाला हवाई दलाचा अभिमान आहे. जय हिंद!’ माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यानेही, ‘आमच्या साहसी हवाई दलाला सलाम,’ असे म्हटले आहे.वेल प्लेड बॉईज; पाकला त्यांच्याच भाषेत उत्तरया सर्वांमध्ये नेहमी आपल्या कल्पक पोस्टने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या सेहवागचा संदेश पुन्हा एकदा लक्षवेधी ठरला. सेहवागने आपल्या नेहमीच्या स्टाईलने उत्तर देत पाकिस्तानच्या माजी कर्णधारांना टोला लगावला आहे. कारण, पाकिस्तानचा संघ क्रिकेट सामना जिंकल्यानंतर त्यांच्या कर्णधाराकडून नेहमी ‘वेल प्लेड बॉईज’ अशीच प्रतिक्रिया माध्यमांना मिळाली आहे. त्यामुळेच सेहवागनेही त्याच भाषेत आपली प्रतिक्रिया देत पाकिस्तानला क्रिकेटच्या भाषेतच समजावलं आहे.
आमच्या चांगल्या स्वभावाला आमची कमजोरी मानू नका. भारतीय हवाई दलाला सलाम. जय हिंद! - सचिन तेंडुलकरभारतीय हवाई दलाचा खूप गर्व वाटतो. आम्ही ‘आयएएफ’ला सलाम करतो जय हिंद!- युवराज सिंग
जय हिंद! भारतीय हवाई दल...- गौतम गंभीर