Goa Assembly Election: गोव्यात काँग्रेस-शिवसेनेला मोठा धक्का, अनेक नेते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 12:23 PM2021-10-21T12:23:16+5:302021-10-21T12:27:46+5:30
काही दिवसांपूर्वीच गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुईझिनो फालेरो TMC मध्ये सामील झाले आहेत.
पणजी:पुढच्या वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा(Goa assembly elections) निवडणुकीपूर्वी गोवाकाँग्रेसचे अनेक नेते ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये(Trinamool Congress ) सामील झाले आहेत. तृणमूल काँग्रेसने गोवा युनिटच्या नेत्यांचे स्वागत केले. बुधवारी, उत्तर गोवा काँग्रेस सेवा दल प्रमुख उल्हास वासनकर त्यांच्या समर्थकांसह आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांसह टीएमसीमध्ये सामील झाले.
त्यांच्याशिवाय काँग्रेसच्या महिला शाखेच्या माजी सरचिटणीस प्रिया राठोडही तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्या आहेत. दरम्यान, काँग्रेससह शिवसेनेचे नेतेही तृणमूलमध्ये सामली झाले आहेत. शिवसेनेचे ब्लॉक अध्यक्ष विनोद बोरकर त्यांच्या काही समर्थकांसह टीएमसीमध्ये सामील झाले. पणजीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पश्चिम बंगाल सरकारचे मंत्री मानस राजन भुनिया आणि गोवा टीएमसी नेते मारिओ पिंटो आणि विजय पै उपस्थित होते.
Inspired by @MamataOfficial and her dedication to work for the welfare of her people, today Shri Ulhas Vasnkar along with activists Shri Umesh Baukar, Shri Ramdas Kolhe and Shri Prabhakar Bhojji joined the Goa Trinamool Congress family.
— AITC Goa (@AITC4Goa) October 20, 2021
We wholeheartedly welcome everyone! pic.twitter.com/3NkILZZsHr
गोव्याचे माजी मुख्यमंत्री TMC मध्ये सामील
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो 29 सप्टेंबर रोजी कोलकात्यात आपल्या समर्थकांसह तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. आपल्या पक्ष प्रवेशादरम्यान फालेरो यांनी गोव्यातील लोकांसाठी 'विभाजनवादी आणि फॅसिस्ट शक्तींविरुद्ध' लढायची घोषणा केली होती. तसेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी यांचे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत केल्याबद्दल कौतुक केले होते.
गोव्याचे राजकीय स्थिती
गोव्यातील 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 40 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला 13 जागा मिळाल्या होत्या. पण, भाजपने प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करुन ज्येष्ठ नेते दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. पण, आता यावेळी आम आदमी पार्टी, शिवसेना, टीएमसीनेही निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे भाजप आणि काँग्रेससमोर मोठे आव्हान असणार आहे.