शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

गोवा टँकरग्रस्त!

By admin | Published: May 02, 2016 12:42 AM

गोव्यातही यंदा दुष्काळाच्या झळा जाणवत असून राज्यातील सुमारे ३0 ते ३५ दुर्गम गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून सार्वजनिक बांधकाम खात्याने १00 टँकर्सद्वारे पाणी

पणजी : गोव्यातही यंदा दुष्काळाच्या झळा जाणवत असून राज्यातील सुमारे ३0 ते ३५ दुर्गम गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून सार्वजनिक बांधकाम्-+ा खात्याने १00 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. केपे भागाला पाणी तुटवड्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. केपे तालुक्यात २५ टँकर्स कार्यरत आहेत. ग्रामीण भागात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाण्याचा दाब किंचित कमी झाला तरी डोंगराळ भागात ते चढत नाही. मार्च ते जून मध्यापर्यंत डोंगराळ भागातील गावांना पाण्याची जास्त टंचाई भासते. सांगे, काणकोण, पेडणे, सत्तरीत डोंगराळ भागांना तसेच बार्देसमधील टोकाकडील किनारी भागांतही पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. डोंगराळ भागात जाण्यासाठी व्यवस्थित रस्तेही नसल्याने लहान वाहनांचे टँकर्स वापरले जात आहेत. . वर्षाकाठी चार ते पाच कोटी रुपये खासगी टँकर्सवर खर्च केले जातात, अशी माहिती प्रधान मुख्य अभियंता दत्तात्रय बोरकर यांनी दिली. मध्यंतरी ओपा जलाशयातील पाण्याची पातळी घटल्याने तेथील बंधाऱ्यांचे पाणी सोडावे लागले. आता २.२ मीटरपर्यंत पातळी आलेली असून पंपिंगसाठी ती पुरेशी असल्याचा दावा त्यांनी केला. एकीकडे नद्यांच्या पाणी पातळी घट झाल्याचे दिसून येत असताना जलस्रोत खात्याकडून मात्र धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. गांजे-ओपा, साळ-आमठाणे, झुवारी-म्हादई नद्यांच्या आंतरजोडणीमुळे पाण्याची उपलब्धता पुरेशी असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)जलस्त्रोत विभागाचा अजब दावाएकीकडे नद्यांच्या पाणी पातळी घट झाल्याचे दिसून येत असताना जलस्रोत खात्याकडून मात्र धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. डोंगराळ भागात जाण्यासाठी व्यवस्थित रस्तेही नसल्याने लहान वाहनांचे टँकर्स वापरले जात आहेत. यंत्रणेने काही खासगी टँकर्स भाड्याने घेतले आहेत.