ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - दर्जेदार शिक्षणाचं महत्त्व अधोरेखीत करताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी उच्च शिक्षणासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे. तसेच प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत 1700 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी जाहीर केले.
राष्ट्रीय कौशल्य विकास मिशनअंतर्गत 76 लाख तरुणांना प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले. पुढे जात 1500 मल्टिस्किल प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट्य असल्याचे जेटली म्हणाले. येत्या तीन वर्षात एक कोटी तरूणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे ध्येय ठेवण्यात आल्याचे जेटली यांनी बजेटच्या भाषणात सांगितले.