पणजी : गोव्याच्या अग्वादा येथील ऐतिहासिक मध्यवर्ती कारागृह आता केवळ कैद्यांचे घर राहणार नाही. या कारागृहाचे पर्यटन स्थळात रूपांतर केले जाणार आहे. राज्य पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या कारागृहात मोठा बदल केला जाणार आहे. ३० मे २०१५ पासून हे कारागृह कैद्यांचे आवास राहिलेले नाही. सर्व कैद्यांना नव्या कारागृहात स्थानांतरित करण्यात आले आहे. या कारागृहाचे हिमाचल प्रदेशच्या धागशाई कारागृह आणि अंदमानच्या सेल्युलर कारागृहाप्रमाणेच संग्रहालयात रूपांतर केले जाईल, असे पर्यटन विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. धाागशाई कारागृह आणि अंदमानचे सेल्युलर कारागृह ही ब्रिटिश काळातील कारागृहे आहेत.
गोव्याचे कारागृह बनणार पर्यटन स्थळ
By admin | Published: May 14, 2016 2:24 AM