ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 24 - क्रिकेटच्या मैदानावर अलौकिक खेळानं जगात स्वतःच वेगळं स्थान प्राप्त केलेल्या क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आज जन्मदिवस. भारतरत्न असलेल्या सचिन तेंडुलकरला आज सोशल मीडियातून अनेक चाहते, हिंतचिंतकांनी वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या सगळ्यात हटके ट्विट करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सेहवागनं सचिन तेंडुलकरला दिलेल्या शुभेच्छा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सेहवागनं क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरला त्याच्या खास शैलीत जन्मदिवसाच्या ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनचे चाहतेही वीरेंद्र सेहवागच्या अशा ट्विटची आतुरतेने वाट पाहत होते. वीरेंद्र सेहवानं ट्विटरवर विमानातून प्रवास करतानाचा स्वतःचा आणि सचिनचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सचिन तेंडुलकर डुलक्या घेताना पाहायला मिळतो आहे. फोटो ट्विट करत सेहवाग लिहितो, "हा एक दुर्मीळ योगायोग आहे. जेव्हा कोणीही गुन्हा करू शकतो, देव झोपले आहेत. एक असा व्यक्ती जो भारतीय वेळ थांबवू शकतो." सेहवागच्या या ट्विटनं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सेहवागचा सचिनाला शुभेच्छा देण्याचा हा अंदाज अनेक चाहत्यांना भावला आहे.
A rare occasion when one could have committed a crime,God ji sleeping.To a man who could stop time in India, #HappyBirthdaySachin@sachin_rtpic.twitter.com/CfPtEKbtSZ— Virender Sehwag (@virendersehwag) April 24, 2017
सेहवागच्या या ट्विटमधून त्याला सचिनबद्दल किती प्रेम, आत्मियता आणि आदर आहे, हे दिसून येते. त्यामुळे कदाचित सचिनच्या फेव्हरेट खेळाडूंमध्ये सेहवागचं नाव घेतलं जात असावं. सेहवागची फलंदाजी पाहून सचिनही केव्हा केव्हा आश्चर्यचकित होत होता. कोणत्या गोलंदाजाची सेहवाग कधी धुलाई करेल, हेदेखील सेहवागबद्दल सांगता येत नव्हते.