नवी दिल्ली : संसदेच्या संवेदनशील ठिकाणांचे व प्रवेशप्रक्रियेचे तपशीलवार व्हिडीओ शुटिंग केल्यामुळे आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान संकटात अडचणीत सापडले आहेत. मान यांनी लेखी स्वरूपात बिनशर्त माफी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे सादर केली. तथापि या चित्रफितीमुळे संसदेच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा आरोप असल्याने केवळ माफीनामा पुरेसा नाही, असे नमूद करीत अध्यक्षा महाजन यांनी चौकशीसाठी ९ संसद सदस्यांची समिती नियुक्त केली असून ३ आॅगस्ट रोजी समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत, मान यांना बंदी घातली. (वृत्तसंस्था)काय होते प्रकरण?गेल्या आठवड्यात मान यांनी त्यांचे वाहन सुरक्षा अडथळे ओलांडून संसद परिसरात प्रवेश करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड केला होता. त्यांनी संसदेच्या प्रश्नांची वर्गवारी जेथे केली जाते त्या खोलीचीही व्हिडिओग्राफी केली होती.
भगवंत मान यांना संसदेत प्रवेशास बंदी
By admin | Published: July 26, 2016 1:40 AM