अहमदाबाद :गुजरातमधील बहुचर्चित गोध्रा हत्याकांडातील (godhra kand) मुख्य आरोपीला तब्बल १९ वर्षांनंतर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. पंचमहल जिल्ह्यातील गोध्रा स्थानकावर साबरमती एक्स्प्रेसच्या एक डब्याला लावलेल्या आगीप्रकरणातील मुख्य आरोपी रफीक हुसैन भटुक याला गोध्रा शहरातून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. १९ वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला होता. (godhra kand accused arrested after 19 years at gujarat)
पंचमहल जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक लीना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रफीक हुसैन भटुक हा संपूर्ण घटनेच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे. गेल्या १९ वर्षांपासून तो फरार होता. एका गुप्त सूचनेनंतर पोलिसांनी सापळा रचून गोध्रा स्थानकाजवळील एका घरातून भटुक याला अटक केली, असे पाटील यांनी सांगितले. अलीकडेच त्याचे कुटुंबीय स्थलांतरीत झाल्याची माहिती मिळाली होती. आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भटुक गोध्रा येथे आला असताना, त्याला सापळा रचून अटक करण्यात आली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
नाझींनी जर्मनीत केले, तेच RSS करतेय; राम मंदिर देणगीवरून कुमारस्वामींची टीका
साबरमती एक्स्प्रेसच्या डब्यांवर दगडफेक करणे, त्यावर पेट्रोल टाकणे यामध्ये भटुकचा सक्रीय सहभाग होता. यानंतर त्याच्या साथीदारांनी डब्याला आग लावली. त्या काळात भटुक गोध्रा रेल्वे स्थानकावर कामगार म्हणून काम करत होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
हत्या आणि दंगली पसरवण्याचा आरोप
गोध्रा हत्याकांड झाल्यानंतर भटुक दिल्लीला पसार झाला होता. भटुक विरोधात हत्या तसेच दंगली घडवणे यांसह अन्य आरोप ठेवण्यात आले आहेत. दरम्यान २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा हत्याकांडात ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला होता. यानंतर मोठ्या प्रमाणात धार्मिक हिंसाचार होऊन दंगली झाल्या.