अहमदाबाद- 2002 गोध्रा हत्याकांडप्रकरणी गुजरात हायकोर्टानं 11 दोषींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर केलं आहे. या दोषींची फाशीच्या शिक्षेऐवजी ती जन्मठेपेत रुपांतरित केली आहे. 27 फेब्रुवारी 2002 साली गोध्रा हत्याकांड झाले होते. साबरमती एक्स्प्रेसच्या 'एस-6' डब्याला 27 फेब्रुवारी 2002ला गोध्रा स्टेशनवर आग लावण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल उसळली होती. या डब्यात 59 प्रवासी होते व त्यातील बहुतांश अयोध्याहून परतणारे कारसेवक होते. याप्रकरणी एसआयटी कोर्टाने 1 मार्च 2011 रोजी 31 जणांना दोषी ठरवण्यात आले होते तर 63 जणांची निर्दोष सुटका करण्यात आली होती. तसेच 11 दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा तर 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती.