शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
3
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
4
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
5
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
6
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
7
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
8
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
9
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
10
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
11
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
12
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
13
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
14
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
15
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
16
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
17
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
18
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
19
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
20
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

भाजपाच्या डोक्यातून कर्नाटक जाईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:50 AM

नेते करत आहेत दावा : आमदार फुटून राज्यात २0१९ पर्यंत होईल सत्तांतर

नवी दिल्ली : कर्नाटकात येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या डोक्यात अद्यापही सरकार स्थापन करण्याचा विचार डोकावत आहे. अमित शहा यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले असून, २0१९ पर्यंत कर्नाटकात सत्तांतर होईल, असे त्यांनी सोमवारी सांगितले.आम्हाला कर्नाटकात फार काही करायची गरज नाही. काँग्रेस व जनता दलाचे आमदारच आमचे काम करतील आणि तेथील सरकार कोसळेल, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यावेळी जनता दलाच्या मदतीने तुम्ही सरकार बनवाल का, असे विचारता शहा म्हणाले की, राजकारणात कायमस्वरूपी असे काहीच नसते. त्यामुळे तेव्हा काय होईल, हे आताच सांगता येत नाही. कदाचित काँग्रेस व जनता दल या दोन्ही पक्षांतील आमदार फुटून वेगळा गट तेव्हा स्थापन करू शकतील.याचाच अर्थ भाजपाने कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करण्याचे सोडून दिलेले नाही. तिथे आपले सरकार पुन्हा येईल, अशी खात्री अमित शहा व भाजपाच्या नेत्यांना वाटत आहे. तसा विश्वास ते आपल्या कार्यकर्त्यांना वारंवार देत आहेत.कर्नाटकात काँग्रेस व जनता दल यांची आघाडी अनैतिक पायावर उभी असल्याचा आरोप अमित शहा यांनी आज केला. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, काँग्रेस व जनता दलाच्या आघाडीमुळे दोन्ही पक्षांचे काही आमदार खूष नाहीत. आमचे त्या आमदारांवर कायम लक्ष राहील. दुसरीकडे कुमारस्वामी सरकारवर आमचा सातत्याने दबाव राहील. ते सरकार काय पद्धतीने काम करते, हे आम्ही पाहू, प्रसंगी त्यांचा गोंधळ जनतेसमोर आणू आणि रस्त्यांवर संघर्षही करू. भाजपा येथे सरकार बनवू शकते, अशी आम्हाला खात्री वाटेल, त्यावेळी दोन्ही पक्षांचे काही आमदार नक्कीच आमच्यासोबत येतील. आम्ही आजही काँग्रेस व जनता दलाच्या काही आमदारांशी संपर्क करुन आहोत. काँग्रेस व कुमारस्वामींच्या आघाडीबद्दल दोन्ही पक्षांत समाधान असे ते आमदार आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे आमच्याऐवजी ते आमदारच स्वत:च्या सरकारच्या विरोधात जात असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल, असे भाजपा नेता म्हणाला. लेकिन भाजपा अभी भी अमित शाह ने म्हणाले की काँग्रेस व जनता दल नेत्यांनी आपल्या सर्व आमदारांना जबरदस्तीने हॉटेलात बंदिस्त करून ठेवले आहे. ते जेव्हा बाहेर पडतील, तेव्हा दोन पक्षांच्या अभद्र आघाडीबद्दल त्यांनाच उत्तरे द्यावी लागतील.आता जाऊ द्या की घरी!सध्या काँग्रेसचे आमदार एका हॉटेलात तर जनता दलाचे आमदार एका रिसॉर्टमध्ये आहेत. निवडून आल्यापासून ते घराबाहेर आहेत.विजयी झाल्यानंतर मतदारसंघात मिरवणुका काढायला त्यांना वेळही मिळाला नाही आणि कार्यकर्त्यांचे आभार मानणे शक्य झाले नाही.कार्यकर्ते सोडा, पण किमान मतदारांचे आभार मानायला तरी आम्हाला मतदारसंघात जायचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर बहुमत सिद्ध व्हावे, अशी आमची इच्छा आहे. आता आम्हाला लवकर घरी जायचे आहे, असे आमदारांनी नेत्यांनाच सांगितले आहे. आज सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार व काँग्रेसचे निरीक्षक खा. वेणुगोपाळ यांनी या आमदारांशी गप्पा मारल्या.आॅडिओ टेप्स खऱ्या की खोट्या?भाजपाने काँग्रेस व जनता दलाच्या आमदारांना पैशांचे आमिष दाखवल्याच्या ध्वनिफिती बाहेर आल्या होत्या. त्यापैकी एका काँग्रेस आमदाराने आपल्या पत्नीस असे कोणतेही आमिष दाखवण्यात आले नव्हते. या आॅडिओ टेप खºया नाहीत, असे सांगून काँग्रेसलाच अडचणीत आणले. दुसºयाने मात्र भाजपाचे नेत्यांचे फोन येताच, त्याचे रेकॉर्डिंग केले. त्याने तीनदा भाजपाकडून आलेल्या फोनवरील संवादाचे रेकॉर्डिंग केले आहे. आपणास आमिष दाखवण्यात आले होते, असे तो म्हणाला.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपा