भोपाळ : मध्य प्रदेशमधील शिवपुरी आणि ग्वाल्हेर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सुल्तानगढ धबधब्यावर फिरण्यास गेलेल्यांपैकी 12 जण अचानक पाण्याची पातळी वाढल्याने वाहून गेले. पाण्याच्या प्रवाहाबरोबर 100 फूट खोल धबधब्यावरून खाली कोसळले.
स्वातंत्र्य दिनाची सुटी घालवण्यासाठी येथील धबधब्यावर जवळपास 40 लोक आले होते. यामध्ये प्रेमी युगुलही होते. नदीच्या मधोमध खडकांवर बसले असताना संध्याकाळी 4 च्या सुमारास अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यामुळे पुन्हा किनाऱ्यावर येणे शक्य झाले नाही. यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर यातील 12 जण वाहून गेले. तर इतरांना हवाई दलाच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आले.
रात्रीच्या अंधारामुळे हेलिकॉप्टर उडू शकत नसल्याने शोधमोहिम थांबविण्यात आली होती. या सर्व घटनेचा व्हिडिओ पहा...