म्हसावदला न जाण्याच्या अटीवर गुलाबराव पाटलांना जामीन कारागृहातून सुटका : पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेत जाण्यावरही निर्बंध
By admin | Published: June 19, 2016 12:15 AM
जळगाव : म्हसावद (ता.जळगाव) येथील पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मयत सभासद हजर असल्याचे दाखवत नवीन कार्यकारिणी गठीत करून फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ात न्यायाधीश एस.बी. देवरे यांच्या न्यायालयाने शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवसेनेचे उपनेते तथा आमदार गुलाबराव पाटील यांना अटी व शर्तींवर १५ हजार रुपयांच्या जामिनासह ५ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यानंतर दुपारी १.२० वाजता त्यांची जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली.
जळगाव : म्हसावद (ता.जळगाव) येथील पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मयत सभासद हजर असल्याचे दाखवत नवीन कार्यकारिणी गठीत करून फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ात न्यायाधीश एस.बी. देवरे यांच्या न्यायालयाने शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवसेनेचे उपनेते तथा आमदार गुलाबराव पाटील यांना अटी व शर्तींवर १५ हजार रुपयांच्या जामिनासह ५ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यानंतर दुपारी १.२० वाजता त्यांची जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली.पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने शुक्रवारी दुपारी आमदार गुलाबराव पाटील यांची जिल्हा कारागृहात रवानगी केली होती. याच दिवशी त्यांनी वकिलामार्फत जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने त्यावर निर्णय राखून ठेवला होता. शनिवारी सकाळी १०.४५ वाजता न्यायाधीश एस.बी. देवरे यांच्या न्यायालयात निकालाच्या कामकाजाला सुरुवात झाली. तासाभरानंतर न्यायालयाने आमदार पाटील यांना जामीन मंजूर केला. चुलतभाऊ असलेले अशोक शालिक पाटील (रा.पाळधी, ता.धरणगाव) हे आमदार पाटील यांचे जामिनदार आहेत.न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व शर्ती१) या प्रकरणात पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल होईपर्यंत संशयिताने न्यायालयाच्या पूर्व परवानगी शिवाय म्हसावद गावात तसेच पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेत जाऊ नये.२) या प्रकरणाचे फिर्यादी, साक्षीदार तसेच त्रयस्थ अर्जदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाब आणू नये.३) पुरवणी दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजेरी लावावी.४) या प्रकरणाच्या प्रत्येक न्यायालयीन तारखेला हजर रहावे, वैयक्तिक कारणे न्यायालयाला देऊ नये.न्यायालयात चोख पोलीस बंदोबस्तआमदार गुलाबराव पाटील यांच्या जामिनावर निर्णय असल्याने शनिवारी सकाळपासून जिल्हा न्यायालयाच्या आवारात पोलीस प्रशासनाकडून खबरदारी म्हणून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून होते.