राजकोट : सुमारे २५ किलो सोने व ५ किलो चांदी येथील विमानतळावर शुक्रवारी रात्री जप्त करण्यात आली. ७.५२ कोटी रुपयांचे हे घबाड चौकशीसाठी आयकर विभागाच्या हवाली करण्यात आले आहे.येथील सराफांसाठी हे सोने व चांदी येथील दोन कुरीअर कंपन्यांमार्फत आले होते. हे सोने कोणत्या सराफांचे होते हे आयकर अधिकाºयांनी सांगितले नसले तरी या प्रकरणात तस्करीची शक्यता त्यांनी नाकारलेली नाही. मुंबईहून रात्री साडेआठ वाजता येथे आलेल्या जेट एअरवेजच्या विमानात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांना (सीआयएसएफ) हे सोने व चांदी आढळले, असे सूत्रांनी सांगितले. पॅकेजवर राजकोटमधील कुरीअर कंपन्यांची नावे असल्यामुळे सीआयएसएफच्या अधिकाºयांनी आयकर विभागाच्या हवाई गुप्तचर शाखेला कळवले. कुरीअर कंपन्यांनी या सोन्याला स्वीकारणाºया सराफांची यादी अधिकाºयांना दिली.कुरीअर कंपन्यांची नावे माताजी एअरवेज आणि राईट कुरीअर अशी आहेत. चार जणांनी दस्तावेज सादर करून या पार्सलवर दावा केला तरी अधिकाºयांना तो दस्तावेज बनावट असल्याचे आढळले. (वृत्तसंस्था)
राजकोटमध्ये ७.५२ कोटींचे सोने व चांदी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 3:11 AM