नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर स्टॉकिस्टांच्या मागणीत घट झाल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोन्याचा भाव 4क्क् रुपयांनी स्वस्त होऊन 27,1क्क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. ही गेल्या एका महिन्याची नीचांकी पातळी आहे. औद्योगिक संस्था व नाणो निर्मात्यांच्या कमजोर मागणीमुळे चांदीचा भावही 55क् रुपयांच्या घसरणीसह 37,85क् रुपये प्रतिकिलो झाला.
कामगार बाजारातील सुधारणोमुळे अमेरिकी फेडरल रिझव्र्हद्वारे आपला भांडवल खरेदी कार्यक्रम संपुष्टात आल्यानंतर डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या मागणीत घट झाली. परिणामी सोन्याचा भाव तीन आठवडय़ांच्या नीचांकी पातळीवर गेला.
लंडन येथे सोन्याचा भाव क्.7 टक्क्यांच्या घसरणीसह 1,2क्3.22 डॉलर प्रतिऔंस राहिला. चांदीचा भावही 1.3 टक्क्यांनी स्वस्त होऊन 16.86 डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.तेजीमुळे भांडवल प्रवाह शेअर बाजाराकडे वळता झाला आणि सध्याच्या पातळीवर मागणी घटल्यानेही बाजार धारणोवर नकारात्मक परिणाम झाला.
दिल्लीत 99.9 व 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 4क्क् रुपयांनी कोसळून अनुक्रमे 27,1क्क् रुपये व 26,9क्क् रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भावही 1क्क् रुपयांच्या घसरणीसह 24,1क्क् रुपयांवर राहिला. तयार चांदीचा भाव 55क् रुपयांनी घटून 37,85क् रुपये प्रति किलो ग्रॅमवर बंद झाला.