नवी दिल्ली : मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या दरांमध्ये घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमत घसरती राहिल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा परिणाम सोन्य़ाच्या किंमतीवर झाला आहे. अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धावरून सुरु असलेल्या तणावामुळे सोन्याकडे गुंतवणूकदार सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत. (Gold rates Today)
दुपारी 10 वाजता ऑगस्टच्या डिलिव्हरीसाठी सोन्याच्या दरात 0.19 टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे सोने प्रति 10 ग्रॅम 49166 रुपयांवर आले आहे. गेल्या सत्रामध्ये हा दर 49259 रुपयांवर बंद झाला होता. आज सकाळी सोने 49288 रुपयांवर उघडले होते. तस चांदीमध्ये 0.65 टक्क्यांची वाढ झाली असून प्रति किलोला 52990 रुपयांचा दर झाला आहे. काल चांदीचा भाव 52649 रुपये होता. आज बाजार सुरु होताना 52840 रुपयांवर आला होता.
तज्ज्ञांनुसार अमेरिका आणि चीनमधील तणाव, वाढती गुंतवणुकीची मागणी आणि जागतिक अर्थव्यवस्थेची सुस्तता यामुळे सोन्याच्या किंमती वाढत चालल्या आहेत. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1800 डॉलरवर गेली होती. कोरोना व्हायरसमुळे वाढत्या रुग्णांची संख्या आणि आंतरराष्ट्रीय तणावामुळे सोने हेच सुरक्षित माध्यम असल्याची भावना गुंतवणूकदारांमध्ये आहे. स्पॉट गोल्ड 0.1 टक्के वाढून 1808.85 डॉलर झाले आहे. मात्र, अमेरिकेमध्ये गोल्ड फ्यूचर्स 0.2 टक्के घटून 1808.90 डॉलरवर आले आहे.
रुपया वधारलाया दरम्यान भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत वधारला आहे. आज रुपया 75.28 प्रति डॉलर वर पोहोचला आहे. शेअर बाजारात सुरुवातीला तेजी होती. मंगळवारी दिल्ली सर्राफा बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीमध्ये घट झाली. सोने 114 रुपये स्वस्त झाले. तर चांदीमध्ये 140 रुपयांची घट झाली. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याची प्रति तोळा किंमत 49996 झाली. सोमवारी हीच किंमत 50110 होती. तर चांदीचा दर प्रति किलो मंगळवारी 53,427 झाला होता. सोमवारी हा दर 53,567 रुपये होता.
अन्य महत्वाच्या बातम्या...
कुठेय लॉकडाऊन; कुठेय मंदी! भारतातल्या सर्वांत महागड्या फ्लॅटची खरेदी; किंमत पाहून हादराल
Reliance AGM 2020: कोरोना लसीवर नीता अंबानींची मोठी घोषणा; इतिहासात पहिल्यांदाच भाषण
आशेचा किरण! कोरोना लसीवर उद्या होऊ शकते 'पॉझिटिव्ह' घोषणा; पुण्याच्या सीरम इन्सिट्युटचाही मोठा वाटा
Breaking : बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर
गेहलोत यांची सचिन पायलटांवर वैयक्तीक टीका; काँग्रेस नेतृत्व झाले नाराज
...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा
...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल