कोरोना काळात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यामध्ये मोठी घसरणही पहायला मिळत आहे. चढ उतारांमुळे सोन्याचे दर अस्थिर असले तरीही लग्न, सोहळे आदींसाठी सोन्याची खरेदी करणे गरजेचे असते. सोन्याचे दर वाढल्याने अनेकांनी ठरलेले लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत. तर काहींन बजेट तेवढेच ठेवले असले तरीही सोने कमी तोळ्यांमध्ये खरेदी करावे लागत आहे. अनेकांनी सोने 60 हजार पार जाणार म्हणून 56000 वर असतानाच सोने खरेदी केले. मात्र, आता सोने 52000 वर घुटमळत असल्याने मनाला हुरहूर लागली आहे.
अशावेळी सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर काही काळ वाट पाहणेच हिताचे ठरणार आहे. गेल्या आठवड्याच सोने आणि चांदीच्या दरात जवळपास 1000 रुपयांची घट झाली. सध्या सोने 52000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 62 हजार रुपये प्रति किलो आहे. जाणकारांनुसार पुढील काळात सोन्या चांदीच्या किंमतीमध्ये घट होणार आहे.
जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेमध्ये मोठे उतार-चढाव पहायला मिळत आहेत. याचा परिणाम अन्य देशांच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. काही देश कोरोना संकटातील मंदीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे तिथे सोन्यामधील गुंतवणूक घटू लागली आहे. त्याच्या उलट अनेक देशांमध्ये कोरोना संकट आणि अर्थव्यवस्थेची हालत गंभीर आहे. यामुळे सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. 5 ऑगस्टला चांदी 74000 वर होती तर सोने 6 ऑगस्टला 58 हजाराच्या जवळ होते.
यामुळे सोनारही मेटाकुटीला आले आहेत. सोने चांदीच्या दरामध्ये चढउतार पाहून ग्राहकही सोने खरेदीकडे पाठ फिरवत आहेत. सोने खरेदीसाठी वाच पाहत आहेत. यासाठी चांगली वेळ कोणती, याच्या शोधात ग्राहक आहेत. काही सोनारांच्या मते पुढील काळात सोन्या चांदीच्या दरात दीड ते दोन महिन्यांत घट होणार आहे. सोने जवळपास 48 हजार आणइ चांदी 55 ते 57 हजार रुपयांपर्यंत येऊ शकते. कारण अनेक देशांमध्ये कोरोना लस पुढील काही महिन्यांत येणार आहे. या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. यामुळे बाजारातील सुस्ती जाणार असून लोक सोन्याऐवजी बँक किंवा अन्य क्षेत्रात पैसे गुंतवायला सुरुवात करणार आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
युद्धाचे संकेत? चीनसोबत चर्चा फिस्कटली तर सैन्य कारवाईचा विचार; सीडीएस बिपीन रावत यांचा इशारा
लय भारी! SBI ATM येणार तुमच्या दारी; केवळ व्हॉट्सअॅप मॅसेज करावा लागणार
धक्कादायक! महिलेवर 143 जणांचा बलात्कार, लैंगिक अत्याचार; 42 पानी FIR दाखल
अफाट संपत्ती! तीन किलो सोने, दोन किलो चांदी, नोटांच्या थप्प्या; टीडीपीच्या नेत्यावर सीबीआयचा छापा
65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य
वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द