देशाच्या राजधानीमध्ये आज सोन्याच्या किंमतीत 268 रुपयांची (Gold price up 286 rupees) वाढ झाली. तर चांदीच्या किंमतीमध्ये 1623 रुपयांची (Silver price up 1623 rupees) वाढ नोंदविली गेली. सोने 50812 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दरावर बंद झाले. गुरुवारी सोने 50544 च्या स्तरावर बंद झाले होते.
चांदीमध्ये आज 1623 रुपयांची वाढ झाली. यामुळे चांदीचा दर 60700 रुपये प्रति किलोग्रॅम झाला होता. गुरुवारी चांदी 59077 रुपये प्रति किलोग्राम स्तरावर बंद झाली होती. ही माहिती एचडीएफसी सिक्युरिटीने दिली आहे.
शेवटच्या दोन सत्रांमधून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीवर जोरदार दबाव दिसला. डिसेंबर डिलिव्हरी वाले सोने 1870 डॉलर प्रति औंसवर घसरले होते. संध्याकाळी 5.40 वाजता इन्व्हेस्टिंग.कॉम वेबसाईटवरील माहितीनुसार सोन्याचा भाव 1879 डॉलर (0.60 टक्के वाढ) व्यापार करत होता. युरोपमध्ये कोरोनाचे संकट वाढू लागल्याने शेअर बाजारावर अनिश्चिततेचे ढग दिसू लागले आहेत. यामुळेच गोल्ड डिलिव्हरीमध्ये वाढ होऊ लागली आहे. MCX वर संध्याकाळी 6 वाजताच्या डेटानुसार 4 डिसेंबरचे सोने 352 रुपयांनी वाढले होते. तर फेब्रुवारीचे सोने 360 रुपयांच्या दरवाढीने 50724 वर गेले होते.
सोन्यातली गुंतवणूक फायदेशीर आहे का?ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक म्हणतात, सोन्यातील गुंतवणूक ही अजिबात फायदेशीर नाही, कारण सोन्याचे भाव वाढले तरी आपण सोनं काही विकायला जात नाही. नुसते कागदोपत्री भाव वाढून त्याचा काहीही उपयोग नाही, त्यामुळे देशाचंही नुकसान होतं आणि आपलंही नुकसान होतं. तसेच घेतलेलं सोनं विकायला गेल्यानंतर सोनार त्यात काही ना काही घट काढतो, त्यामुळे आपलं नुकसान होतंच. सोन्याचे कागदोपत्री भाव जरूर वाढतात, ते नाकारता येत नाही. पण त्यातून आपल्या हाती किती फायदा येतो, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. गुंतवणूकदारही सोनं विकत घेतात, पण ते विकत नाही, त्यामुळे त्यातून काहीच फायदा होत नाही. सोन्याचे दर जरी वाढत असले तरी सोनं कोणीही विकत नाही. त्यामुळे काहीही फायदा होत नाही. मात्र, आपण जर बाजारभावाचा उपयोग करून सोनं घेणार असू तर सोन्यासारखी फायदेशीर गुंतवणूक नाही हे मान्य!
कसा ठरतो सोन्याचा भाव?डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत जात आहे, त्यामुळे सोन्याच्या भावाने ४५ हजारांचा टप्पा कधीच पार केला आहे, तर दुसरीकडे कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. अशा परिस्थितीत लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.