जयपूर: आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या तस्करीची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. यातच तस्कर तस्करीचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. अशाच प्रकारची घटना जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. दुबईहून आलेल्या एका प्रवाशाला सोने तस्करीच्या आरोपात पकडण्यात आली आहे.
लाखो रुपयांचे सोने जिभेखाली लपवले होतेदूबईहून एक प्रवासी जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. तो स्क्रीनिंग मशीनमधून जात असताना मशीन बीप करत होती. मात्र त्याचा शोध घेतला असता काहीही आढळून आले नाही. यानंतर अधिकाऱ्यांनी प्रवाशाची वैयक्तिकरित्या तपासणी केली. यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली. या व्यक्तीने तोंडात जिभेखाली सोने लपवले होते. या सोन्याचे वजन 116.590 ग्रॅम होते.
लाखो रुपयांचे सोनेसीमाशुल्क अधिकारी बी.बी. अटल यांनी सांगितले की, एअर इंडियाची फ्लाइट क्रमांक AI 942 ने प्रवासी आज पहाटे 4:20 वाजता जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. त्यातील एका प्रवाशाला स्क्रिनिंग मशीनमधून पास करण्यात आले. यादरम्यान सोने लपवून आलोल्या व्यक्तीची ओळख पटली. त्याने जिभेखाली 5 लाख 79 हजार 452 रुपये किमतीचे 116.590 ग्रॅम सोने लपवले होते.
अधिकाऱ्यांनी सोने जप्त केलेसीमाशुल्क कायदा 1962च्या तरतुदीनुसार त्या व्यक्तीकडून हे सोने जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. सोन्याच्या तस्करीप्रकरणी जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आलेला आरोपी मूळचा भारतीय असून तो दुबईत काम करतो. भारतात येण्यापूर्वी त्यांनी कमावलेल्या पैशातून सोने खरेदी केले होते.