नवी दिल्ली: सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर नव-नवीन मार्ग शोधत असतात. अशाच प्रकारची एक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. कस्टम विभागाने शारजाहून परतलेल्या एका भारतीय नागरिकाकडून तब्बल 43 लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. विशेष म्हणजे, या व्यक्तीने सोने लपवण्यासाठी अशी जागा निवडली, ज्या जागेचा कुणी विचारही केला नसेल.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद विमानतळावर शारजाहमधून एक भारतीय नागरिक परत आला होता. त्याने आपल्यासोबत शारजाहवरुन 43 लाख रुपयांचे 895.20 ग्रॅम सोने आणले. हे सोने लपवण्यासाठी त्याने आपल्या अंडरविअरचा वापर केला. आपल्याकडील सोन्याला वितळून त्याने त्याची पेस्ट बनवून घेतली आणि ही सोन्याची पेस्ट त्याने अंडरविरमध्ये लपवली. पण, अधिकाऱ्यांना याची माहिती लागली आणि पोलिसांनी त्या व्यक्तीला त्या सोन्यासोब पकडले.
नियम काय सांगतोसीमाशुल्क नियमांनुसार, एक वर्षापेक्षा जास्त काळ परदेशात असणाऱ्या भारतीयांना त्यांच्या सामानात 50,000 रुपयांचे 20 ग्रॅम सोने आणण्याची परवानगी आहे. तर, महिलांना 40 ग्रॅम सोने आणण्याची परवानगी आहे.