सुरेश भटेवरा, नवी दिल्लीपंतप्रधान मोदी सध्या मोझाम्बिक, द. आफ्रिका, टांगानिका, केनिया या देशांच्या दौऱ्यावर आहेत. सतत परदेशवारीवर पंतप्रधान असा लौकिक असलेल्या मोदींनी, गेल्या २ वर्षांत जवळपास ५0 देशांचे दौरे केले. आपल्या कारकिर्दीत पहिल्या दोन वर्षांत वाजपेयींनी ८ तर मनमोहन सिंगांनी १४ देशांचे दौरे केले होते. त्या तुलनेत मोदी लवकरच आपल्या परदेश दौऱ्यांचा सुवर्णमहोत्सव पूर्ण करीत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २0१४ साली जून ते नोव्हेंबर या ६ महिन्यांत मोदींनी ९ देशांचे दौरे केले. २0१५ साली २७ देशांचे दौरे केले तर २0१६च्या पहिल्या ६ महिन्यांत आफ्रिकेच्या ताज्या दौऱ्यासह १५ देशांचा दौरा पंतप्रधान पूर्ण करतील. त्यांच्या परदेशवारीचे वर्षवार तपशील पुढीलप्रमाणे- वर्षांत पंतप्रधान ११३ दिवस परदेश दौऱ्यावर होते. २0१४ साली २७ दिवस, २0१५ साली ६५ दिवस तर २0१६च्या १३ जुलैपर्यंत २१ दिवस असे त्यांचे दौरे झाले. मोदींच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्याचा खर्च ८.९१ कोटी, अमेरिकेचा ६.१३ कोटी, जर्मनी २.९२ कोटी, फिजी २.५९ कोटी, चीन २.३४ कोटी असा आहे. सर्वांत कमी खर्चाचा दौरा भूतान ४१.३३ लाख होता.