शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

राममंदिर भूमिपूजनाचा अयोध्येत सुवर्णक्षण, पाच शतकांच्या कडव्या संघर्षानंतर दिसला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 2:14 AM

योगी आदित्यनाथ; मोदींमुळेच रामजन्मभूमी प्रश्न सुटला

अयोध्या : पाच शतकांच्या अविरत व कडव्या संघर्षानंतर राममंदिराच्या भूमिपूजनाचा हा सुवर्णक्षण दिसला आहे. लोकशाही मूल्यांचा आदर करीत, राज्यघटनेच्या चौकटीत राहून व शांततामय मार्गाने राममंदिर प्रश्नावर तोडगा काढण्यात आला, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

राममंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर उपस्थित साधू-संत व निमंत्रितांच्या सभेत ते म्हणाले की, अयोध्येत राममंदिर उभे राहावे, असे स्वप्न गेल्या पाच शतकांपासून अनेक पिढ्यांनी उराशी बाळगले होते. हे स्वप्न सत्यात उतरावे म्हणून अनेकांनी संघर्ष केला होता. अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदानही दिले. काही शतके त्या स्वप्नपूर्तीसाठी लढा देण्यात येत होता. लोकशाही मार्गाने व राज्यघटनेच्या चौकटीत राहून एखाद्या प्रश्नावर समर्पक तोडगा निघू शकतो, हे राममंदिर प्रश्नाच्या उदाहरणावरून भारताने साऱ्या जगाला दाखवून दिले आहे.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शीपणामुळेच राममंदिराचा प्रश्न सुटू शकला आहे. मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच राममंदिरावर तोडगा निघण्यासाठी योग्य वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मोदी यांच्या हस्तेच राममंदिराचा भूमिपूजन सोहळा होतो आहे, हाही एक विशेष प्रसंग आहे. अयोध्येमध्ये भव्य राममंदिराचे बांधकाम शक्यतो लवकर पूर्ण करण्यात येईल.योगी आदित्यनाथ म्हणाले की, राममंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी साºया वातावरणात उत्साह आहे. हा प्रसंग भावनात्मक ही आहे. जातपात, प्रांतिक, भाषिक असे कोणतेही मतभेद न पाळता राममंदिर उभारण्यासाठी आतापर्यंत सारे झटले होते. तेच चित्र भविष्यातही सर्वांना दिसणार आहे. हा एका नव्या भारताचा प्रारंभ आहे. ‘सब का साथ, सब का विकास’ हे आमच्या कारभाराचे सूत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या विकासासाठी उत्तर प्रदेश सरकारला खूप मदत केली आहे. शरयू नदीच्या तीरावरील घाटांचे सौंदर्यीकरण, उत्तम रस्ते बांधणे, अशी अनेक कामे या शहरात पूर्ण झाली आहेत.तिढा शांततेने सुटला याचा अभिमानउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, सुमारे ५०० वर्षे केलेल्या संघर्षाचे फलित राममंदिर भूमिपूजनाच्या रूपाने आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. १३५ कोटी भारतवासीयांची तसेच जगभरातील सर्व रामभक्तांची राममंदिर बांधण्याची इच्छा आता प्रत्यक्षात येणार आहे. राममंदिराचा तिढा अत्यंत शांततेने सुटला, याचा आम्हाला अभिमान आहे.उपराष्टÑपती एम. व्यंकय्या नायडू यांनी पत्नी उषा यांच्यासह उपराष्टÑपती भवनात रामायण पठण केले. त्यांच्या कुटुंबियांनी कोविडविरोधी लढा आणि राममंदिरासाठी १० लाखांची देणगी दिली. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथRam Mandirराम मंदिर